मुंबई :  राजस्थानने रॉयल्सने (Rajsthan Royals) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) नवव्या सामन्यात 5 वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 23 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला. तर मुंबईचा हा सलग दुसरा पराभव ठरला. मात्र मुंबईचा युवा फलंदाज टिलक वर्माने (Tilak Varma) शानदार खेळी करत अर्धशतक ठोकलं. यासह तिलकने इशान किशनचा (Ishan Kishan) विक्रम मोडित काढला. (ipl 2022 mi vs rr mumbai indians tilak varma become yongest player who scored fifty and braek ishan kishan record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वात कमी वयाचा मुंबईकर बॅट्समन


तिलक वर्माने 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 5 सिक्ससह 61 धावांची खेळी केली. तिलक यासह मुंबईकडून सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकणारा बॅट्समन ठरला. 


याआधी हा विक्रम इशानच्या नावे होता. इशानने  2018 मध्ये वयाच्या 19 वर्ष 278 दिवशी अर्धशतक झळकावण्याची किमया केली होती. तर तिलकने वयाच्या 19 वर्ष 145 व्या दिवशी अर्धशतक केलं.