TATA च्या 7.99 लाखांच्या कारवर मिळतोय बंपर डिस्काऊंट; तब्बल 7 लाख लोकांनी खरेदी केली 'ही' कार

टाटा मोटर्सने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आपली प्रसिद्ध एसयुव्ही Tata Nexon ला घरगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. गेल्या 7 वर्षात ही एसयुव्ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.   

Jun 20, 2024, 18:03 PM IST

टाटा मोटर्सने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आपली प्रसिद्ध एसयुव्ही Tata Nexon ला घरगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. गेल्या 7 वर्षात ही एसयुव्ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. 

1/10

टाटा मोटर्सने सप्टेंबर 2017 मध्ये पहिल्यांदा आपली प्रसिद्ध एसयुव्ही Tata Nexon ला घरगुती बाजारपेठेत लाँच केलं होतं. गेल्या 7 वर्षात ही एसयुव्ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे.   

2/10

नुकतंच कंपनीने आपल्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलला नव्या अंदाजात लाँच केलं होतं. यामध्ये अनेक बदल करण्यात आले होते.   

3/10

गेल्या 7 वर्षात या एसयुव्हीच्या 7 लाखांपेक्षा अधिक युनिट्सची विक्री झाल्याचा कंपनीचा दावा आहे.   

4/10

या क्षणी कंपनीने टाटा नेक्सॉनवर बंपर डिस्काऊंट जाहीर केला आहे. याअंतर्गत ग्राहक 1 लाखाची बचत करु शकतात.   

5/10

काही दिवसांपूर्वी कंपनीने नेक्सॉनच्या बेस व्हेरियंटला फक्त 7.99 लाखात लाँच केलं होतं. या व्हेरियंटवर कोणताही डिस्काऊंट दिला जात नाही आहे.   

6/10

दरम्यान पेट्रोल इंजिनसह येणाऱ्या स्मार्ट, स्मार्ट प्लस आणि स्मार्ट एस व्हेरियंट वर अनुक्रमे 16 हजार, 20 हजार आणि 40 हजारांची सूट दिली जात आहे.   

7/10

प्योर आणि प्योर प्लस व्हेरियंटवर ग्राहक अनुक्रमे 30 आणि 40 हजारांची बचत करु शकतात. तर डिझेल व्हेरियंटवर 20 आणि 30 हजारांची सूट मिळत आहे.   

8/10

सर्वाधिक सूट क्रिएटिव्ह व्हेरियंटवर मिळत आहे. क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह प्लस आणि क्रिएटिव्ह एस व्हेरियंटवर अनुक्रमे 60 हजार, 80 हजार आणि 1 लाखांचा लाभ मिळत आहे.   

9/10

तसंच नेक्सॉनच्या फिअरलेस व्हेरियंटच्या पेट्रोल आणि डिझेल दोन्हींवर 60 हजारांचा डिस्काऊंट मिळत आहे.   

10/10

टाटा नेक्सॉन देशातील सर्वात सुरक्षित एसयुव्ही आहे. नुकतंच त्याच्या नव्या मॉडेलची क्रॅश टेस्ट घेण्यात आली. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली होती.