मुंबई : जॉस बटलरच्या (Jos Butller) शतकी खेळी आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले आहे. राजस्थानने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 193 धावा केल्या. ( ipl 2022 mi vs rr rajsthan royals set 194 runs winning target for mumbai indians jos buttler shine)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जॉसने 68 चेंडूत 11 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतकी खेळी केली. शतक ठोकल्यानंतर जॉस आऊट झाला. तर शिमरॉन हेटमायरने जोरदार फटकेबाजी केली. शिमरॉनने 14 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 35 धावांची वादळी खेळी केली.


तर कॅप्टन संजू सॅमसनने 30 धावांचं योगदान दिलं. तर मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्सने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.


मुंबई प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंह, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थम्पी. 


राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन :  जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, संजू समॅसन (कॅप्टन/विकेटकीपर), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, नवदीप सैनी, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेन्ट बोल्ट आणि युजवेंद्र चहल