IPL 2022 : मान वर करुन पाहावं इतकी उंची, धडधाकट शरीर, टी20 क्रिकेटमध्ये एक शतक तर 56 अर्धशतकं, आपल्या स्फोटक खेळीने सर्वाधिक चर्चेत असणारा खेळाडू म्हणजे कायरन पोलार्ड. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्टइंडीज आणि मुंबई इंडियन्सचा खतरनाक ऑलराउंडर कायरन पोलार्ड याचा आज वाढदिवस. टी20 क्रिकेटच्या महान खेळाडूंपैकी एक असलेला पोलार्ड आपल्या गगनभेदी षटकारांसाठीसुद्धा सर्वांना परिचित आहे.  


बालवयातच संघर्षाची सुरुवात... 
इतका महान खेळाडू बनणं त्याच्यासाठी फारसं सोपं नव्हतं. पोलार्डच्या जन्मानंतरच त्याचे वडील त्याला आणि त्याच्या आईला एकटं सोडून निघून गेले होते. घरातील परिस्थिती अत्यंत वाईट असतानाही परिस्थितीवर मात करुन पोलार्डचे संगोपन त्याच्या आईनेचं केले. (kieron pollard Birthday)


पोलार्ड आणि त्याचा आईला एक वेळचे जेवण मिळणेही कठीण झालं होतं. त्याचं लहानपण पोर्ट ऑफ स्पेनच्या टकारिगुआ या भागात झालं. त्यावेळी हा परिसर गुंडांच्या वर्चस्वाखाली होता.


हत्या, लूट, ड्रग्स आणि गांजा असे अवैध धंदे या भागासाठी काही नवीन नव्हते. अशा सगळ्या परिस्थितीतही न डगमगता किंवा आपलं लक्ष विचलित न होऊ देता पोलार्ड आज एक यशस्वी फलंदाज आहे.


एकदा मुलाखतीत पोलार्ड म्हणाला होता, '15 वर्षाचा असल्यापासून मी क्रिकेटचा सराव सुरु केला. आजुबाजुला असलेल्या कोणत्याही परिस्थितीचा मी क्रिकेटवर परिणाम न होऊ देता मेहनतीच्या जोरावर मी हे यशाचे शिखर गाठले'. 


पोलार्डची बॅट म्हणजे जणू तुफानी खेळी करणारी एक दणकट जादूची काडी. अशा या जादूगार पोलार्डची तुम्हाला भावलेली खेळी कोणती? कमेंटमध्ये नक्की कळवा...