MI vs GT IPL 2022 : मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) प्राण्यांविषयी विशेष प्रेम आहे. प्राण्यांची सुरक्षा आणि त्यांच्या संरक्षणाच्या मोहिमेत रोहित शर्मा नेहमीच सहभागी असतो. आज गुजरात टायटन्स (GT) विरुद्धच्या सामन्यात रोहितने मारलेल्या एका सिक्सनं आसाममध्ये सापडणाऱ्या एक शिंगी गेंड्यांना 5 लाख रुपये मिळवून दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात टायटन्सचा गोलंदाज अल्जारी जोसेफच्या बॉलिंगवर रोहितने जोरदार सिक्स ठोकला. चेंडू बुलेटच्या वेगाने सीमारेषेबाहेर गेला आणि तिथे उभ्या असलेल्या टाटा पंच गाडीवर आदळला. रोहित शर्माच्या या सिक्समुळे आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला (Kaziranga National Park) पाच लाख रुपये मिळणार आहेत. 


काय आहे 'टाटा मोटर्स'ची योजना
टाटा मोटर्स ही आयपीएलची अधिकृत प्रायोजक आहे. बॅट्समनने मारलेला चेंडू टाटा पंच बोर्ड किंवा सीमेबाहेर उभ्या असलेल्या 'पंच कार'वर आदळल्यास काझीरंगा नॅशनल पार्कला 5 लाख रुपये देण्‍याची घोषणा टाटा मोटर्सने केली होती. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्यांसाठी ओळखलं जातं.