मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 23 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स (MI vs PBKS) यांच्यात सामना सुरु आहे. मुंबईने पंजाब विरुद्धच्या या आरपारच्या सामन्यात एकमेव बदल केला आहे. कॅप्टन रोहित शर्माने स्टार खेळाडूला एन्ट्री दिली आहे. तर दुसऱ्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ( ipl 2022 mumbai indians vs punjab kings captain rohit sharma tymal mills replace to ramandeep singh in playing eleven)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितने या 'करो या मरो'च्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमध्ये टायमल मिल्सला (Tymal Mills) संधी दिली आहे. तर रमनदीप सिंहला (Ramandeep Singh) डच्चू देण्यात आला आहे.


आकडेवारी कोणाच्या बाजूने?


दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये आतापर्यंत मुंबई इंडियन्सचा वरचष्मा राहिला आहे. मुंबई इंडियन्सने 15 सामने जिंकले आहेत, तर पंजाब किंग्जने 13 सामने जिंकले आहेत.


मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, जयदेव उनादकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स आणि बासिल थंपी.  


पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कप्तान), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो (विकेटकीपर), लियाम लिविंगस्टन, जितेश शर्मा, ओडियन स्मिथ, शाहरुख खान, कगिसो रबाडा, राहुल चाहर, वैभव अरोडा आणि अर्शदीप सिंह.