IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सीजनमध्ये आता स्पर्धा आणखी वाढत आहे. सर्व संघांनी 7 हून अधिक सामने खेळले आहेत. फलंदाजांमध्ये टॉपवर राहण्यासाठी कांटे की टक्कर दिसत आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अनेक दिगज्ज खेळाडू आहेत. राजस्थानचा जोस बटलर या स्पर्धेत सर्वात वर आहे. त्याच्या नंतर केएल राहुल, धवन, हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांचा नंबर लागतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीच्या विरुद्ध 116 रनची खेळी करणारा बटलर याने आतापर्यंत या सीजनमध्ये 3 शतकं ठोकली आहेत. त्याने आतापर्यंत 491 रन केले आहेत. मुंबईच्या विरुद्ध शतकीय खेळी करणारा केएल राहुल 368 रनसह दुसऱ्या स्थानावर आहे. शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यात 302 रन आहेत.


धवननंतर गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या चौथ्या स्थानावर आहे. कोलकाताच्या विरुद्ध त्याने 67 रनची खेळी केली असून त्याने एकूण 295 रन केले आहेत.


मुंबईचा युवा खेळाडू तिलक वर्मा 272 रनसह पाचव्या स्थानावर आहे. फाफ डु प्लेसिस सहाव्या स्थानावर असून त्याने 255 रन केले आहेत.


दिल्लीचा ओपनर पृथ्वी शॉ 254 रनसह 7 व्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यर 248 रनसह 8 व्या स्थानावर आहे. 9 व्या स्थानावर शिवम दुबे (247) तर 10 व्या स्थानावर चेन्नईचा अंबाती रायडू (246) आहे.