मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर (South Africa Tour Of India 2022) येणार आहे. आफ्रिका या दौऱ्यात टीम इंडिया (Team India) विरुद्ध  सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने (Bcci) केएल राहुलच्या नेतृत्वात 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या सीरिजमध्ये मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच टीम इंडियाची बी टीम आफ्रिका विरुद्ध भिडणार आहे. (ipl 2022 pbks bowler arshdeep singh recived maiden india call up against to south africa t20i series)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सीरिजसाठी टीम इंडियात जसप्रीत बुमराहसारख्याच भेदक गोलंदाजाला संधी देण्यात आली आहे. हा गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. टी 20 मॅचमध्ये काही ओव्हर या निर्णायक असतात. हा गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये धावांवर ब्रेक लावण्यात माहिर आहे.


हा बॉलर अचूक यॉर्कर टाकण्यात माहिर आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमात पंजाब किंग्सकडून खेळलेल्या अर्शदीपला आफ्रिका विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी संधी दिली आहे.


अर्शदीपने 15 व्या हंगामातील 13 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या. अर्शदीपने चमकदार कामगिरी करत निवड समितीचं लक्ष वेधलं. अर्शदीपने केलेल्या कामगिरीची दखल घेत निवड समितीने त्याची निवड केली.


त्यामुळे आता संघात निवड झाल्यानंतर अर्शदीपला पदार्पणाची संधी मिळणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या टी 20 मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होणार आहे.


टी 20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम 


टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.


टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.