देशातील राजकीय परिस्थिती पाहून क्रिकेटपटू हैराण, ट्विट करत म्हणाला....
या क्रिकेटरने देशवासियांना ट्विटद्वारे एक भावूक संदेश लिहिला आहे. तसेच ट्विटमधून सरकारलाही धारेवर धरलं आहे.
मुंबई : श्रीलंकेतील परिस्थिती (Sri Lanka Crisis) दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळे संशयितांना तत्काळ अटक करून ताब्यात घेण्याचे अधिकार सुरक्षा दलांना मिळाले आहेत. देशाची आर्थिक स्थिती बिघडली आहे, अशा परिस्थितीत सरकारच्या धोरणांच्या निषेधार्थ श्रीलंकेतील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. (ipl 2022 pbks sri lanka captain bhanuka rajapaksa wrote emotional tweet over to sri laka crises and political condition)
आता श्रीलंकेचा क्रिकेटर भानुका राजपक्षे लंकेतील जनतेच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. राजपक्षेने देशवासियांना ट्विटद्वारे एक भावूक संदेश लिहिला आहे. तसेच ट्विटमधून राजपक्षेने श्रीलंका सरकारलाही धारेवर धरलं आहे.
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
"मी अनेक मैल दूर असलो तरीही मला माझ्या सहकाऱ्यांच्या वेदना समजू शकतो, जे दररोज संघर्ष करत आहेत. आता त्यांचा आवाज दाबण्यासाठी मूलभूत अधिकारही संपुष्टात आणले आहेत. पण जेव्हा 22 दशलक्ष जनतेचा आवाज एकाच वेळी उठतो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही",असं राजपक्षेने ट्विटमध्ये म्हटलंय.
"देशवासियांचा आवाज ऐकायला हवा. श्रीलंकेतील लोकांना निर्भयपणे जगण्याचा अधिकार मिळायला हवा, अन्यथा ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार नाहीत. लोकांना कोणत्याही परिस्थितीत संरक्षित केलं पाहिजे", असंही राजपक्षेने नमूद केलं.
भानुका सध्या आयपीएलच्या 15 व्या मोसमात पंजाब किंग्सकडून खेळतोय. भानुकासाठी पंजाब किंग्सने 50 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं.