29 मॅचनंतर पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, कॅप्टन केनची टीम टॉप 5 मध्ये
राजस्थान-कोलकाता पिछाडीवर, कॅप्टन केनची गाडी सुसाट... पाहा पॉईंट टेबलचं बदलेलं समीकरण
मुंबई : आयपीएलचे सामने सध्या प्लेऑफच्या दिशेनं जात आहेत. त्यामुळे स्पर्धा अधिक अटीतटीची होत आहे. चेन्नई आणि मुंबई टीमच्या प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. तर कॅप्टन केननं कामलीची केली आहे.
चेन्नई विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातने 3 विकेट्सने विजय मिळवत आपलं पहिलं स्थान कायम ठेवलं आहे. आतापर्यंत 6 पैकी 5 सामन्यांमध्ये हार्दिक पांड्याने विजय मिळवला आहे. पॉईंट टेबलमध्ये गुजरात टीम पहिल्या स्थानावर आहे.
दुसऱ्या स्थानावर लखनऊ टीम आहे. 6 पैकी चार सामने जिंकून लखनऊने दुससं स्थान टिकवलं आहे. तर कोलकाता आणि राजस्थानची घसरगुंडी झाली आहे. बंगळुरू टीम 4 सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे.
शेवटून तिसऱ्या स्थानावर असलेल्या हैदराबादने मुसंडी मारली आणि टॉप 5 मध्ये आपल्या नावाची नोंद केली. 6 पैकी 4 सामने जिंकून हैदराबाद चौथ्या स्थानावर पोहोचलं आहे. पाचव्या स्थानावर राजस्थान तर सहाव्या क्रमांकावर कोलकाता आहे.
मुंबई टीम शेवटून पहिली आहे. यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकण्यात त्यांना यश आलं नाही. चेन्नई टीम केवळ 1 सामना जिंकून आपलं खातं उघडलं पण त्यानंतर काही यश मिळालं नाही.
दिल्ली आणि पंजाब टीम देखील चांगलं खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे प्रयत्न यंदा कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. त्यामुळे प्ले ऑफपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.