मुंबई : आयपीएलमध्ये चार ट्रॉफी जिंकणाऱ्या टीममागचं पराभवाचं ग्रहण काही केल्या सुटेना. चेन्नई पुन्हा एकदा गुजरात विरुद्ध 3 विकेट्सने सामना हरली आहे. या सामन्यात खेळाडूंनी खूप छोट्या छोट्या चुका केल्या त्यामुळे सामना हातून गेला. कर्णधार रविंद्र जडेजा खेळाडूंवर खूप संतापल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅच सुरू असताना चक्क हातात आलेला कॅच फिल्डिंग करताना सोडला. तो बॉलकडेच पाहात राहिला आणि कॅच घ्यायला विसरला अशी अवस्था त्याची झाली. हातात आलेला कॅच त्याने सोडल्याने बॉलर आणि जडेजाला राग अनावर झाला. 


CSK चा हिरो म्हणून ओळखला जाणाऱ्या शिवम दुबेनं हा पराक्रम केला. त्याच्याकडून ही अपेक्षा कोणालाच नव्हती. शिवम दुबे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. तर संतापलेल्या जडेजानं कॅप काढून संताप व्यक्त केला. 


एवढा सोपा कॅच सोडल्यानंतर ब्रावोही नि: शब्द झाला. त्यानेही डोक्यावर हात मारून घेतला. जडेजा आणि ब्रावोची प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.