मुंबई : यंदाचा आयपीएल 2022 चा 15 वा हंगाम अति चुरशीचा होणार आहे. 10 संघ आणि 70 सामने खेळवण्यात येणार आहेत. जवळपास सगळं निश्चित झालं आहे. मात्र अजूनही RCB संघाला त्यांचा कर्णधार निश्चित करण्यात यश आलं नाही. त्याच दरम्यान आता पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

360 डिग्रीचा मास्टर एबी डिव्हिलियर्स पुन्हा RCB संघासोबत जोडला जाणार आहे. यावेळी त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे बंगळुरूच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे. यावेळी मैदानात प्रत्यक्षात एबी डिव्हिलियर्स खेळताना दिसणार नसला तरी त्याची भूमिका संघात खूप महत्त्वाची ठरणार आहे. 


एबी डिव्हिलियर्सकडे RCB चं मेंटर होण्याची जबाबादारी दिली जाण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या अजून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्याने आपण क्रिकेट खेळणार नसल्याची घोषणा आयपीएल 2022 च्या ऑक्शनपूर्वीच केली होती. मात्र RCB सोबत जोडलं राहणार असल्याचं दिसत आहे. 


12 मार्च रोजी यासंदर्भातील अधिकृत घोषणा होणार आहे. यंदाचं आयपीएल खूप वेगळं असणार आहे. दोन गटांमध्ये प्रत्येकी 5 संघ विभागले आहेत. गटानुसार आणि दोन गट एकमेकांविरुद्ध असे सामने होणार आहेत. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत.