IPL मध्ये भारतीय गोलंदाजाचा धमाका, या खेळाडूचं टी 20 वर्ल्ड कपसाठी स्थान निश्चित?
क्रिकेट म्हटलं की गोलंदाजांची धुलाई ही ठरलेलीच असते. मात्र या मोसमात टीम इंडियाचा गोलंदाज हा फार चिवटपणे कमी धावा देत दमदार गोलंदाजी करतोय.
मुंबई : सध्या सर्वत्र आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) हवा आहे. क्रिकेट म्हटलं की गोलंदाजांची धुलाई ही ठरलेलीच असते. मात्र या मोसमात टीम इंडियाचा गोलंदाज हा फार चिवटपणे कमी धावा देत दमदार गोलंदाजी करतोय. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं (T 20I World Cup 2022) आयोजन करण्यात आलं आहे. या वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही चांगली बातमी आहे. (ipl 2022 rcb royal challengers bangalore and team india star bowler harshal patel)
हा गोलंदाज मोठ्यात मोठ्या बॅटिंग ऑर्डरला मैदानाच्या बाहेर पाठवू शकतो. याची छोटी झलक आयपीएलच्या 15 व्या मोसमात पाहायला मिळाली. हा गोलंदाज भविष्यात प्रतिस्पर्धी संघांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. हा गोलंदाजामध्ये आपल्या एकट्याच्या जीवावर टीमला मॅच जिंकून देण्याची क्षमता आहे.
हा बॉलर दुसरा तिसरा कोणी नसून हर्षल पटेल (Harshal Patel) आहे. हो तोच हर्षल पटेल ज्यांनी आयपीएलच्या 14 व्या मोसमात पहिली हॅट्रिक घेतली होती. तसेच पर्पल कॅप विनर ठरला होता.
आरसीबीकडून खेळणाऱ्या हर्षलने मंगळवारी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात अगदी चिवट गोलंदाजी केली. हर्षलने 4 ओव्हरमध्ये 18 धावा देत 1 विकेट घेतली होती. या दरम्यान हर्षलचा इकॉनॉमी रेट हा फक्त 4.50 इतका होता.
टी 20 मध्ये इतक्या कमी इकॉनॉमी रेटने धावा देणारे गोलंदाज फारच क्वचित असतात. हर्षल त्यापैकी एक आहे. हर्षलने टीम इंडियाकडून आतापर्यंत एकूण 8 टी 20 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या होत्या. हर्षलची 22 धावा देत 3 विकेट्स ही सर्वोच्च वैयक्तिक कामगिरी राहिली आहे.
टी 20 वर्ल्ड कपमध्ये जागा निश्चित?
आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये हर्षल पटेलचं टीम इंडियामधील स्थान निश्चित समजलं जात आहे.