मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा अजून कर्णधार ठरला नाही. IPL चे सामने सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 12 मार्च रोजी कर्णधारपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे ठरणार आहे. मात्र त्याआधी तीन जणांच्या नावाची चर्चा आहे. यामध्ये फाफ ड्यु प्लेसिस, दिनेश कार्तिक, विराट कोहलीच्या नावाची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीनं कर्णधारपद सोडलं असलं तरी पुन्हा एकदा मॅनेजमेंट त्याला मनवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे विराट कोहलीचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. काही लोकांनी कोहलीकडे पुन्हा कर्णधारपद द्यावं अशी मागणी केली आहे. मात्र माजी क्रिकेटपटूनं कोहलीला कर्णधारपद देऊ नये असं म्हटलं आहे. 


माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने कोहलीकडे कर्णधारपद देऊ नये असं म्हटलं आहे. 'कोहलीनं आपल्याला मुक्तपणे खेळता यावं यासाठी कर्णधारपद सोडलं. त्याला त्याच्या बॅटिंगवर फोकस करायचा आहे. त्यामुळे त्याच्या डोक्यावर हे ओझं फ्रान्चायझीनं देऊ नये. त्याचा हा निर्णय संघासाठी खूप जास्त फायद्याचा ठरू शकतो. 


कोहली मैदानात फ्री हॅण्ड मिळाल्याने उत्तम फलंदाजी करू शकतो. त्याच्या डोक्यात कर्णधारपदाचं टेन्शन राहणार नाही. गेली अनेक वर्ष तो दबावाखाली आहे. त्यामुळे आता त्याला पुन्हा RCB ने ती जबाबदारी देऊ नये.' असं आकाश चोप्राने आपलं मत व्यक्त केलं आहे. 


12 मार्च रोजी RCB चा कर्णधार कोण असणार त्याचं नाव समोर येणार आहे. त्यामुळे आता कोणाच्या खांद्यावर ही कर्णधारपदाची धुरा पडणार आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.