मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) कॅप्ट्न्सीचा जलवा पुन्हा पाहायला मिळाला. जाडेजा अपयशी ठरल्याने त्याने नेतृत्व सोडलं. यानंतर पुन्हा धोनीकडे संघाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर धोनीने सूत्र सांभाळली. धोनीने पहिल्याच सामन्यात चेन्नईला विजय मिळवून दिला. चेन्नईचा आज सामना आरसीबी विरुद्ध होणार आहे. या सामन्यात धोनीला अनेक रेकॉर्ड करण्याची संधी आहे. (ipl 2022 rcb vs csk capain m s dhoni will be become 1st player who played 200 matches for chennai super kings)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीचा आरसीबी विरुद्धचा आजचा सामना हा त्याचा चेन्नईसाठीचा 200 वा सामना असणार आहे. यासह धोनी चेन्नईकडून 200 सामने खेळणारा पहिलाच खेळाडू ठरेल. 


चेन्नईकडून सर्वाधिक सामने


एमएस धोनी- 199* मॅच
सुरेश रैना- 176 मॅच
रवींद्र जडेजा - 141 मॅच
ड्वेन ब्रावो - 114 मॅच


धोनीने आयपीएल कारकिर्दीत एकूण 229 सामने खेळले आहेत. यामधील 30 सामन्यात त्याने राइजिंग पुणे जायंट्सचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यावेळेस 2 वर्ष चेन्नईवर बंदी घालण्यात आली होती. 


कर्णधार म्हणून 6 हजार धावा करण्याची संधी


धोनीला कर्णधार म्हणून टी 20 क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण करण्याची संधी आहे. यासाठी धोनीला फक्त 6 धावांची गरज आहे. धोनीने आतापर्यंत 5 हजार 994 धावा केल्या आहेत. सध्या टी 20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराटने आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून 6 हजार 451 धावा केल्या आहेत. 


आरसीबी विरुद्ध सिक्सची फिफ्टी 


धोनीला आणखी एक विक्रम करण्याची संधी आहे. धोनीने आतापर्यंत आरसीबी विरुद्ध 46 सिक्स मारले आहेत. त्यामुळे धोनीने आरसीबी विरुद्ध आजच्या सामन्यात 4 सिक्स लगावल्यास त्याचे 50 सिक्स पूर्ण होतील.