मुंबई : विराट कोहलीने तिन्ही फॉरमॅटसोबत IPL मधील बंगळुरू संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. बंगळुरू संघाचा नवा कर्णधार धोनीचा खास खेळाडू फाफ डु प्लेसिस आहे. आयपीएल सुरू होण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. 26 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध पहिला सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू संघाने फाफला 7 कोटी रुपये देऊन संघात घेतलं. त्याच्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देखील दिली. मात्र आता दिग्गज स्पीनरने जे वक्तव्य केलं त्यामुळे सोशल मीडियावर आणि क्रीडा विश्वात चर्चेला उधाण आलं आहे. 


पुढच्या वर्षी पुन्हा एकदा विराट कोहली बंगळुरू संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याच्याकडे पुन्हा कर्णधारपद येऊ शकतं असं वक्तव्य दिग्गज स्पिनरने केलं आहे. आर अश्विननं हे वक्तव्य केल्यानंतर चर्चेला उधाण आलं. कोहलीनं फलंदाजीवर फोकस करता यावा म्हणून कर्णधारपद सोडत असल्याचं म्हटलं होतं. 


बंगळुरू संघ विराट कोहलीला मनवण्यात अपयशी ठरला मात्र पुन्हा एकदा पुढच्या वर्षी विराटच्या खांद्यावर बंगळुरू संघाची जबाबादरी येऊ शकते असं अश्विन म्हणाला आहे. डुप्लेसिसचं आयपीएलमधील करिअर संपण्याच्या मार्गावर आहे. तो आयपीएल 3 वर्षच खेळू शकतो. 


कर्णधारपदामुळे विराटची काही वर्ष तणावात गेली. आता पुन्हा तो आपल्या फलंदाजीकडे लक्ष देऊ शकतो. पण पुन्हा पुढच्या वर्षी त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची कमान दिली जाण्याची शक्यता असल्याचं आर अश्विन म्हणाला आहे. 


आर अश्विन यंदा राजस्थान संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने याबाबत युट्यूबवर आपल्या चॅनलवर वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर पुन्हा कोहलीकडे कर्णधारपद द्यावं की नाही याबाबत चर्चा रंगल्याचं दिसत आहे.