मुंबई : आयपीएलचा पंधरावा हंगाम अत्यंत वाईट राहिला आहे. 6 पैकी एकही सामना जिंकण्यात मुंबईला यश आलं नाही. सहाव्या पराभवानंतर रोहित शर्माने आपली चूक असल्याचं म्हटलं आहे. हे अपयश माझ्या चुकीनं आल्याची भावना व्यक्त केली. रोहित शर्मा नाराज होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई टीमने पराभवाचा सिक्सर ठोकला आहे. आतापर्यंत एकही फलंदाज यशस्वी ठरला नाही. इतकच नाही तर आता मुंबई आयपीएलच्या प्ले ऑफ स्पर्धेतून बाहेर होणार आहे. लीगमधून बाहेर होणारी ही पहिली टीम असणार आहे. 


रोहित शर्माकडून चूक मान्य
'टीमला चांगली सुरुवात मी देऊ शकलो नाही. याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. याची जबाबदारी मी घेतो. हा जगाचा अंत नाही, आपण याआधीही परत चांगल्या फॉर्ममध्ये आलो आहोत आणि पुन्हा फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करू असा विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला.'


रोहितकडून के एल राहुचं कौतुक
'के एल राहुलने खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी केली असं मला वाटतं. आम्ही सामना हरलो तरी पुन्हा नव्याने डोकं वर करून ताठ मानेनं नव्या आव्हानासाठी तयार राहातो. आम्ही स्वत: ला तयार करण्याचा प्रयत्न करतो आणि हे खूपच वेगळं आहे. '


मुंबईनं गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. के एल राहुलला आऊट किंवा रन आऊट करण्यात मुंबई टीम अपयशी ठरली. बुमराहने 24 धावा दिल्या. तर जयदेव उनादकट, मुरुगन अश्विनच्या बॉलवर मोठ्या धावांचा आकडा उभा करण्यात लखनऊला यश आलं.


मुंबईने 6 सामने गमवाले आहेत. एकही विजय मिळवू शकले नाहीत. ते लीगमधून बाहेर जाण्याची शक्यता आहे. आता उर्वरित प्रत्येक सामना जिंकणं मुंबईला शक्य होईलच असं नाही. प्ले ऑफच्या आशा मुंबईसाठी मावळल्या आहेत.