मुंबई : राजस्थानचमधील स्टार खेळाडूच्या घरी गुडन्यूज आहे. स्फोटक फलंदाजाने आपल्या चिमुकल्यासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. आयपीएलदरम्यान तो बाबा झाल्याचा आनंद खूप जास्त आहे. त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमधील सामने अधिक चुरशीचे होत आहेत. आता सामने प्लेऑफच्या दिशेनं जात असताना एक आनंदाची बातमी आहे. राजस्थानचा स्टार खेळाडू  शिमरोन हेयमायर बाबा झाला आहे. त्याच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं. त्याने सोशल मीडियावर पहिला फोटो शेअर केला आहे. 


इन्स्टाग्रामवर नवजात बाळासोबत खेळताना दिसत आहेत. या जगात आपलं स्वागत आहे. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे असं शिमरोन म्हणाला आहे. त्याने आपल्या बाळासोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. 



शिमरोनवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्याने आयपीएलमधून ब्रेक घेतला होता. आता तो लवकरच टीमसोबत जोडला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.