मुंबई : आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. 26 मार्चला चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. संपूर्ण आयपीएलची कॉमेंट्री 8 भाषांमध्ये होणार आहे. त्यासाठी जवळपास 80 जणांची टीम तयार करण्यात आली आहे. दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेसाठी 8 भाषांमध्ये कॉमेंट्री होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षा भोगले, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, सुरेश रैना, आकाश चोपडा, इरफान पठान असे अनेक दिग्गज लोक कॉमेंट्री करणार आहेत. यंदा रवी शास्त्री आणि सुरेश रैना कमेंटेटरच्या भूमिकेत दिसणार आहेत. कॅप्टनला किती पगार मिळतो ते पाहिलं पण या कॉमेंटेटरला किती पगार असतो आज त्याबद्दल जाणून घेऊया. 


एका अहवालानुसार आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणाऱ्यांना कोट्यवधी रुपये पगार मिळतो. यामध्ये इंग्लिश कॉमेंट्री टीम सर्वाधिक पैसे घेते. सहाजिकच त्यांना जगभरात पाहिलं जातं त्यामुळे त्यांची फी जास्त आहे. त्याखालोखाल हिंदी आणि इतर भाषांच्या कॉमेंट्रीसाठीचा पगार असतो. 


यंदाच्या हंगामासाठी 1.9 कोटी ते 7 कोटी रुपयांपर्यंत कॉमेंट्री करणाऱ्यांना पगार देण्यात आला आहे. हर्षा भोगले, इयान बिशप, सुनील गावस्कर, केविन पीटरसन, माइकल स्लेटर, साइमन डुल, डॅनी मॉरिसन सारख्यांना 5 लाख डॉलर्सपर्यंत कमेंट्रीचे पैसे मिळाले आहेत. 


हिंदी कॉमेंट्री करणाऱ्यांना 70 लाख ते 3 कोटी रुपये पगार आहे. यामध्ये आकाश चोपडा यांना सर्वात जास्त पगार मिळतो. इरफान पठान, गौतम गंभीरला दोन लाख डॉलर्स पगार मिळतो.