मुंबई :  आयपीएलच्या 15 व्या मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरूवात होत आहे. हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे. एका बाजूला या 15 व्या मोसमाबाबत क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला आयपीएलच्या इतिहासात 3 घातक खेळाडू पहिल्यांदाच खेळणार नाहीत.  त्यामुळे या 15 व्या हंगामात क्रिकेट चाहत्यांना  या खेळाडूंची उणीव भासणार आहे. हे तिघे खेळाडू नक्की कोण आहेत, हे आपण पाहुयात.  ९ipl 2022 season 15th ab de villiers amit mishra and piyush chawala not playing due to unsold० 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एबी डी व्हीलियर्स (ab de villiers)


एबी डी व्हीलियर्स गोलंदाजांचा कर्दनकाळ. मैदानात चौफेर फटकेबाजी करणारा आणि कोणत्याही स्थितीत संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू. आरसीबीकडून (RCB) खेळलेल्या एबीने गेल्याच वर्षी निवृत्ती जाहीर केली.


त्यामुले एबी पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. डिव्हिलियर्सने आयपीएलच्या 184 सामन्यांमध्ये 5 हजार 162 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतकं आणि 40 अर्धशतकं केली आहेत. दरम्यान आता आरसीबीने डीव्हीलियर्सची मेन्टॉरपदी निवड केली आहे.  


अमित मिश्रा (Amit Mishra)


आतापर्यंत बहुतांश वेळा आयपीएलचं भारतात आयोजन करण्यात आलंय. भारतातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना नेहमीच उपयुक्त ठरल्या आहेत. आतापर्यंत आयपीएलमध्ये फिरकीपटू अमित मिश्राने शानदार कामगिरी केली आहे.  


मिश्राने आयपीएलमध्ये 154 सामन्यांमध्ये 23.97 च्या सरासरीने आणि 7.35 च्या इकॉनॉमी रेटने 166 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासात मिश्रानंतर फक्त मलिंगा आणि ड्वेन ब्राव्होने जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल मेगा लिलावात मिश्रा अनसोल्ड राहिला. त्यामुळे मिश्रा यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही.


पियूष चावला (Piyush Chawla)


टीम इंडियाने 28 वर्षांनंतर 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला. पियूष चावला या वर्ल्ड कप विजयी संघाचा भाग होता. मात्र या मेगा ऑक्शनमध्ये पियूष अनसोल्ड राहिला.


पियूषने आयपीएलमधील 165 सामन्यांमध्ये 27.39 च्या सरासरीने आणि 7.88 च्या इकॉनॉमी रेटने 157 विकेट्स घेतल्या आहेत. पियूषने 2008 ते 2013 या दरम्यान पंजाबचं प्रतिनिधित्व केलं. पियूष त्यानंतर 2014 ते 2019 पर्यंत कोलकाताकडून खेळला.