श्रेयसचा एकच थ्रो... के एल राहुलचा करेक्ट कार्यक्रम
पुणे: IPL म्हटलं की उत्कंटा वाढवणारे क्षण आलेच. क्रिकेटमध्ये चपळाई आलीच. हिच चपळाई शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जाइंट्स (LSG) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) मॅचमध्ये सुद्धा पाहण्यास मिळाली. टॉस हारल्यानंतर लखनऊ सुपर जाइंट्सने बॅटिंगला सुरुवात केली. LSG कडून क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) आणि के एल राहुल ( K L Rahul ) मैदानात उतरले. दोघांनी सावध सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. मात्र दोघे सेट होण्यापूर्वीच KKR च्या कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) एक सटीक थ्रो लखनऊला दणका देऊन गेला. के एल राहुल चोरटी धाव घेण्याच्या तयारी असतानाच श्रेयसने राहुलला रन आऊट केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला.
पुणे: IPL म्हटलं की उत्कंटा वाढवणारे क्षण आलेच. क्रिकेटमध्ये चपळाई आलीच. हिच चपळाई शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जाइंट्स (LSG) आणि कोलकाता नाइट राइडर्स (KKR) मॅचमध्ये सुद्धा पाहण्यास मिळाली. टॉस हारल्यानंतर लखनऊ सुपर जाइंट्सने बॅटिंगला सुरुवात केली. LSG कडून क्विंटन डिकॉक (Quinton de Kock) आणि के एल राहुल ( K L Rahul ) मैदानात उतरले. दोघांनी सावध सुरुवात करण्याचं ठरवलं होतं. मात्र दोघे सेट होण्यापूर्वीच KKR च्या कॅप्टन श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer) एक सटीक थ्रो लखनऊला दणका देऊन गेला. के एल राहुल चोरटी धाव घेण्याच्या तयारी असतानाच श्रेयसने राहुलला रन आऊट केलं आणि तंबूचा रस्ता दाखवला. .
केकेआर कडून टिम साउदीने (Tim Southee) ने बॉलिंगला सुरुवात केली. मॅचच्या पाचव्या बॉलचा सामना डिकॉकने केला. हलक्या हाताने फटका मारून डिकॉकने के एल राहुल याला रन घेण्याचा कॉल दिला. अर्धा पीच धावण्यापूर्वीच चित्त्याच्या गतीने श्रेयस बॉलवर धावून गेला आणि वाऱ्याच्या वेगाने स्टंपकडे बॉल फिरकावला. श्रेयसच्या या थ्रोमुळे राहुलची इनिंग संपुष्टात आली.
श्रेयसच्या थ्रोमुळं राहुल कोणताही बॉल न खेळताच शून्यावर आऊट झाला. या मौसमात राहुल 11 मॅचमध्ये तिसऱ्यांदा शून्यावर आऊट झाला आहे. राहुलला आऊट केल्यानंतर KKR च्या गोटात जल्लोषाचं वातावरण तयार झालं. संघाला एक चांगली सुरुवात मिळाली होती. एका स्फोटक फलंदाजाला शून्यावर आऊट करण्याची मजा काही औरच