Ruturaj Gaikwad | ऋतुराजची वादळी खेळी, मात्र तरीही खराब रेकॉर्ड
मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली.
पुणे : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) सनरायजर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध झंझावाती खेळी केली. ऋतुराजने मैदानात चौफेर फटकेबाजी केली. ऋतुराजने हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. ऋतुराजने बॅटिंग करताना जे करायला हवं होतं ते सर्व काही केलं. मात्र शेवटी माशी शिंकली. ऋतुराज नर्व्हस नाईंटीचा शिकार झाला. (ipl 2022 srh vs csk rututaj gaikwad become 5th batsman who out on 99 runs in ipl)
ऋतुराजचं शतक अवघ्या एका धावेने हुकले. त्यामुळे क्रिकेट चाहते हे हळहळले. ऋतुराजने 57 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 99 धावांची शानदार वादळी खेळी केली. मात्र शतकासाठी कमी पडलेली एक धाव 99 धावांसमोर वरचढ ठरली. ऋतुराज 99 धावांवर आऊट झाल्याने त्याच्या नावावर खराब रेकॉर्ड झाला आहे.
ऋतुराज आयपीएलमध्ये 99 धावांवर आऊट होणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी विराट कोहली, पृथ्वी शॉ, ईशान किशन आणि ख्रिस गेल 99 वर आऊट झाले आहेत.
दरम्यान न्नई सुपर किंग्सने सनरायजर्स हैदराबादला (SRH) 203 धावांचे कडकडीत आव्हान दिले आहे. चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 202 धावा केल्या. ऋतुराज व्यतिरिक्त डेवोन कॉनवेने 55 बॉलमध्ये 8 फोर आणि 4 सिक्ससह 85 धावांनी नाबाद खेळी केली.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन : केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडेन मार्करम, निकोलस पूरन (विकेटकीपर), शशांक सिंह, वॉशिंगटन सुंदर, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, मार्को जानसेन आणि उमरान मलिक.
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन : एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, डेवोन कॉन्वे, अंबाती रायडू, सिमरजीत सिंह, रवींद्र जडेजा, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, मुकेश चौधरी आणि महीष तीक्ष्णा.