मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) आतापर्यंत यशस्वीरित्या 9 सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. गेली 2 वर्ष कोरोनामुळे चाहत्यांना स्टेडियमध्ये उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. मात्र बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने या 15 व्या मोसमात सर्व खबरदारी घेतली आहे. त्यानंतर कोरोनाचा ओसरता जोर पाहता स्टेडियममध्ये एकूण क्षमतेच्या 25 टक्के चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. (ipl 2022 star commentator aakash chopra tested corona positve)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकारने कोरोना नियम शिथिल केल्याने 6 एप्रिलपासून  स्टेडियममध्ये 50 टक्के लोकांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्येही जल्लोषाचं वातावरण आहे. मात्र ज्याची भिती होती अखेर तेच झालं. आयपीएल 2022 मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राला कोरोना झाला आहे. आकाशने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.


ट्विटमध्ये काय म्हटलंय? 


"जवळपास कोरोनाला 2 वर्ष सहन केल्यानंतर अखेर मी ही त्याच्या कचाट्यात सापडलो आहे.  कोरोनाची सूक्ष्म लक्षणं आहेत. लवकरच यातून सावरेन", असा आशावाद आकाशने या ट्विटमधून व्यक्त केला आहे. आकाशने कोरोनातून लवकरात लवकर सावरावं यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.