मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग म्हणून IPL कडे पाहिलं जातं. या लीगमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र खेळतात. या लीगमध्ये युवा खेळाडूंनाही आपली उत्तम कामगिरी दाखवण्याची संधी असते. आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. यंदा आयपीएलचा 15 वा हंगाम खेळवण्यात येणार आहे. 26 मार्च रोजी पहिला चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांची नजर युवा खेळाडूंवर असणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या लीगमध्ये तीन क्रिकेटपटू असे आहेत किंवा होते जे अपयशी ठरले. सुपर फ्लॉप खेळाडूंचा हा आदर्श कुणीही घेऊ नये असा आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये भारतीय क्रिकेटपटूचंही नाव आहे. कोण आहेत हे खेळाडू जाणून घेऊया.


चेतेश्वर पुजारा


कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विश्वास असणारा आणि मजबूत खेळाडू म्हणून याच्याकडे पाहिलं जायचं. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्येही पुजारा फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. आयपीएलमध्ये देखील पुजाराला अपयशच आलं आहे. त्याला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने केवळ 30 सामने खेळून 390 धावा केल्या. 


टी 20 क्रिकेटमधील पुजाराचा रनरेट फारच कमी आहे. पुजाराला 2021 मध्ये चेन्नई संघात समाविष्ट करण्याक आलं होतं. मात्र 2022 मध्ये तो चेन्नईकडून खेळणार नाही. 


सौरव गांगुली


टीम इंडियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून गांगुली यांच्याकडे पाहिलं जातं. मात्र आयपीएलच्या पीचवर गांगुली यांना फार यश खेचून आणता आलं नाही. संपूर्ण आयपीएलमध्ये ते केवळ 59 सामने खेळले त्यांनी यामध्ये 1349 धावा केल्या. 7 अर्धशतक त्यांच्या नावावर आहेत. 


वसीम जाफर


वसीम जाफरचं भारतीय क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे. आयपीएलमध्ये मात्र त्याला विशेष यश मिळालं नाही. त्याला केवळ 8 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये 130 धावा केल्या. 8 सामन्यात त्याने 14 चौकार, 3 षटकार आणि 1 अर्धशतक ठोकलं होतं.