IPL Title Sponsor: आयपीएलने `वीवो` ला केलं `TATA`, स्पर्धेला मिळाला नवा टायटल स्पॉन्सर
आयपीएल स्पर्धा आता नव्या नावाने ओखळली जाणार आहे, आयपीएल बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे
IPL Title Sponsor: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल आता नवा टायटल स्पॉन्सर मिळाला आहे. 2022 पासून TATA ग्रुपच्या हातात टायटल स्पॉन्सर असेल. म्हणजेच आता ही स्पर्धा 'टाटा आयपीएल' या नावाने ओळखली जाणार आहे. TATA ने चिनी मोबाईल कंपनी VIVO ची जागा घेतली आहे.
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी ही माहिती दिली आहे. 2022 पासून टाटा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर असतील.
आयपीएलची महत्त्वाची बैठक
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची आज महत्त्वाची बैठक झाली, ज्यामध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. यात सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे टाटा ग्रुपला आयपीएलचं टायटल स्पॉन्सर बनवण्यात आले आहे. याशिवाय अहमदाबाद संघ विकत घेणार्या सीव्हीसी ग्रुपला करार पत्र सुपूर्द करण्यात आल आहे.
विवोसाठी शेवटचं वर्ष
VIVO ने 2018 मध्ये IPL टायटल स्पॉन्सरशिप हक्क विकत घेतले होते. यासाठी कंपनी बीसीसीआयला दरवर्षी 440 कोटी रुपये देत होती. विवोचा हा करार 2022 पर्यंत होता. गेल्या वर्षी भारत आणि चीनमधील वादामुळे देशात विवो कंपनीला बराच विरोध झाला होता, तेव्हा विवोला वर्षभरासाठी ब्रेक घ्यावा लागला होता.
आयपीएलसाठी 2022 वर्ष खास
आयपीएलचा 2022 चा हंगाम अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण यावेळी मेगा लिलाव आहे, त्याचप्रमाणे टायटल स्पॉन्सर म्हणून विवोचे हे शेवटचे वर्ष असेल. इतकेच नाही तर आयपीएलला लवकरच नवीन मीडिया प्रायोजकही मिळणार आहे, कारण स्टारकडे असलेले आयपीएलचे हक्कही 2022 पर्यंत संपणार आहेत.