मुंबई : आयपीएल सामन्याच्या प्ले ऑफचे गणित आता सुटणार आहे, कारण आता अवघेच सामने उरले आहेत, त्यामुळे प्लेऑफचा निकाल आता लागणार आहे. यादरम्यानच भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंग याने (Harbhajan singh)प्लेऑफ संदर्भात भविष्यवाणी केली आहे. (IPL 2022) दोन्हीही दिग्गज खेळाडूंनी एकाच संघाचे नाव घेतले आहे. त्यामुळे आता नेमका कोणता संघ प्लेऑफमध्ये जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात प्रथमच लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघ उतरले आहेत. दोन्ही संघाचा परफॉर्मन्स आतापर्यंत चांगला राहिला आहे. तसेच पॉईंटस टेबल पाहता लखनऊ सुपर जाएंटस 11 सामन्यातून 8 विजय मिळवत प्रथम स्थानी आहे, तर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) देखील 11 सामन्यातून 8 सामने जिंकत दुसऱ्या स्थानी आहे.


आज गुजरात टाइटन्स (Gujarat Titans) आणि लखनऊ सुपर जायन्ट्समध्ये (Lucknow Super Giants) सामना होणार आहे. या सामन्यानंतर प्लेऑफमध्ये कोणता संघ प्रथम पोहोचतो याचा निकाल लागणार आहे.


दरम्यान प्लेऑफच्या या शर्यतीबाबत आता माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि माजी स्पिनर गोलंदाज हरभजन सिंहने भविष्यवाणी केली आहे.


सुनील गावस्कर गावस्कर प्लेऑफवर म्हणाले, गुजरात टायटन्सचा संघ निकालाची चिंता न करता निर्भयपणे क्रिकेट खेळतो. त्यांच्या खेळात कोणतीही भीती दिसत नाही आणि म्हणूनच ते जिंकत आहेत. त्यामुळे त्यांची कामगिरी चांगली होत आहे. तसेच ते खेळाचा आनंद घेत आहेत म्हणून ते जिंकतायत. गुजरात टायटन्स सध्या 11 सामन्यांपैकी 8 विजयांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे.


गुजरात लखनऊ विरूद्धचा सामना जिंकत प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरेल, असे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंहने म्हटले आहे. हार्दिक पांड्याचा संघ खूप मजबूत आहे. राशिद खान उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्रशिक्षक आशिष नेहरा त्याला आवश्यक आत्मविश्वास देत आहेत. या संघाला हरवणे खूप कठीण असल्याचे हरभजनने म्हटले आहे.