मुंबई: आयपीएलचे सामने अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. 10 संघ आणि 10 सामने दोन ठिकाणं आयपीएलची तयारीही पूर्ण झाली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 संघ आणि अनेक खेळाडू वेगवेगळे झाले आहेत. कधी जोड्या फुटल्या आहेत. आज आपण अशा तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत जे RCB आणि मुंबई दोन्ही संघाकडून खेळले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजवेंद्र चहल
युजवेंद्र चहलला सुरुवातीला विशेष संधी मिळाली नाही. 2013 मध्ये मुंबई इंडियन्समधून तो केळला. त्यानंतर त्याला RCB ने आपल्याकडे घेतल. गेल्या वर्षी युजवेंद्र चहलचा आयपीएलमध्ये चांगला फॉर्म पाहायला मिळाला. त्यामुळे त्याच्यासाठी टीम इंडियामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. युजवेंद्र चहल देखील बंगळुरू संघाकडून खेळणार आहे. 


पार्थिव पटेल
तीन वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवणाऱ्या संघाचा सदस्य पार्थिव पटेल राहिला आहे. चेन्नई संघ सोडल्यानंतर 2015 आणि 2017 मध्ये पार्थिव पटेल मुंबई संघातून खेळला होता. या दरम्यान पार्थिव पटेल 40 सामने खेळला होता. 2018 मध्ये तो RCB संघात गेला. सध्या तो बंगळुरू संघाकडून खेळत आहे. 


टीम साऊदी
टीम साउदी सुरुवातीला मुंबई इंडियन्स संघासाठी खेळला. त्याने 14 सामन्यात 12 विकेट्स घेतल्या. त्यानंतर 2018 मध्ये RCB संघात त्याला घेण्यात आलं. तिथे 11 सामने खेळून 6 विकेट्स घेण्यात यश मिळालं. मात्र दोन्ही संघात त्याला फारशी विशेष कामगिरी करता आली नाही.