मुंबई : आयपीएलचा  (IPL 2022) पाच वेळा किताब जिंकणारा मुंबई इंडियन्सचा (Mumbai indians) संघ यंदाच्या मोसमात साजेशी खेळी करण्यास अपयशी ठरलाय. प्रत्येक मोसमात अंतिम सामन्यांपर्यत पोहोचणारा हा संघ यंदाच्या मोसमात काही खास कामगिरी करू शकला नाही आहे. यंदाच्या मोसमातील मुंबईच्या अपयशामागे तीन खेळाडूंचे नाव चर्चेत येत आहे. हे तीन खेळाडू मुंबईच्या अपयशाचे का कारण ठरतायंत जाणून घेऊयात...   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईची या मोसमात सुरूवातचं खराब झाली होती. सुरूवातीचे सामने देवाला करता करता खूप उशिराने मुंबईच्या पारड्यात यश आले. मुंबई इंडियन्सला पहिल्यांदाच एका मोसमात 10 पराभवांना सामोरे जावे लागले आणि केवळ 4 सामने जिंकता आले. या मोसमात मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमागे 3 खेळाडूंचा मोठा हात होता. हे तिन्ही खेळाडू या मोसमात पूर्णपणे फ्लॉप ठरले.


कायरन पोलार्ड 
मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हा T20 मधील सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे, परंतु या हंगामात तो बॅट आणि बॉल या दोन्ही बाबतीत फ्लॉप ठरला. कायरन पोलार्डने या मोसमात 11 सामने खेळले, या सामन्यांमध्ये त्याने केवळ 14.40 च्या सरासरीने 144 धावा केल्या. गोलंदाजीतही त्याला कमाल करता आली नाही. त्याने या मोसमात 8.93 च्या इकॉनॉमीने धावा खर्च करून केवळ 4 विकेट घेतल्या.


टायमल मिल्स
मुंबई इंडियन्सने या हंगामात वेगवान गोलंदाज टायमल मिल्सला दीड कोटी रुपयांना विकत घेतले होते. मात्र संघाने दाखवलेल्या विश्वासावर टायमल मिल्स (Tymal Mills)  खरा उतरला नाही. मिल्सने आयपीएल 2022 मध्ये 5 सामन्यात फक्त 6 विकेट घेतल्या. यामुळेच त्याला नंतर संघातून वगळण्यात आले. टायमल मिल्सला 4 वर्षांनंतर आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, पण यावेळीही तो फ्लॉप ठरला आणि घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 मधून बाहेर पडला.


रोहित शर्मा
मुंबई संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही (Rohit sharma) या मोसमातील खराब कामगिरीने चाहत्यांची निराशा केली. रोहित शर्मा या मोसमात फलंदाज आणि कर्णधार म्हणून फ्लॉप ठरला. आयपीएल 2022 मध्ये त्याने 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीने केवळ 268 धावा केल्या. या मोसमात त्याचा स्ट्राइक रेटही १२०.१८ होता. या मोसमात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही.