मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 51 सामने आतापर्यंत खेळवण्यात आले. आतापर्यंत 4 आणि 5 ट्रॉफी मिळवणाऱ्या टीमलाही यंदा नव्या दोन टीमने मागे टाकलं आहे. यंदाची चुरस आणि लढत एक वेगळीच रंग आणत आहे. प्लेऑफपर्यंत यंदा 4 कोणत्या टीम जाणार याची उत्सुकता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा पंधरावा हंगाम हळूहळू नॉक-आऊट सामन्याकडे जात आहे. 10 टीममधील दोन टीम प्लेऑफमधून बाहेर पडल्या आहेत. आता 8 पैकी 4 टीम प्लेऑफमध्ये पोहोचतील. पॉईंट टेबल पाहता कोणत्या चार टीमने आपलं तिकीट निश्चित केलं आहे जाणून घेऊया. 


गुजरात-लखनऊचा मार्ग सोपा
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात आणि लखनऊ टीमने जास्त प्रभावशाली खेळ गाजवल्याचं पाहायला मिळत आहे. पॉईंट टेबलवर पहिल्या स्थानावर 16 पॉईंटसह गुजरात तर दुसऱ्या स्थानावर लखनऊ टीम आहे. लखनऊकडे 14 पॉईंट्स आहेत. त्यामुळे या दोन्ही टीम प्लेऑफपर्यंत पोहोचतील यात शंका नाही. 


आता लखनऊ टीम पुढचे दोन्ही सामने पराभूत झाली तर मात्र त्याचा फटका या टीमला पोहोचू शकतो. नाहीतर लखनऊ प्लेऑफमध्ये जाणार हे निश्चित झालं आहे. 


राजस्थान आणि बंगळुरूमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थान तिसऱ्या तर बंगळुरू चौथ्या स्थानावर आहे. बंगळुरूकडे 12 पॉईंट आहेत. अजून प्लेऑफसाठी त्यांना 2 ते 3 सामने जिंकावे लागणार आहेत. 


हैदराबाद, दिल्ली कैपिटल्स आणि पंजाब किंग्स टीमचे 10 पॉईंट्स सारखे आहेत. त्यामुळे या तीन टीममध्ये चुरस आहे. या तीन टीम प्लेऑफच्या रेसमध्ये मुसंडी मारतात का हे पाहावं लागणार आहे. 


आयपीएलच्या सुरुवातीला धडाकेबाज कामगिरी करून कोलकाता टीम टॉपवर होती. मात्र नंतरचे सामने गमावल्याने मोठा तोटा झाला. कोलकाता टीम मुंबई आणि चेन्नईसोबत प्लेऑफच्या स्पर्धेतून जवळपास बाहेर गेल्यात जमा आहे.