मुंबई : Hardik Pandya: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या याच्यासोबत एक विचित्र घटना घडली आहे. त्यानंतर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक (Natasa Stankovic) हिने अशी प्रतिक्रिया दिली की त्याचीच जास्त चर्चा होत आहे. लाइव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्यासोबत एक विचित्र घटना घडली. त्यामुळे पत्नी नताशा हिने असे हावभाव केले की त्यामुळे नक्की काय झाले, याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता नताशा स्टॅनकोविक हिची आश्चर्यकारक प्रतिक्रियाची चर्चा होत आहे. याचा फोटो सोशल मीडियावर होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध गुरुवारी खेळल्या गेलेल्या IPL सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाला 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा (GT)  कर्णधार हार्दिक पांड्यासोबत एक विचित्र घटना घडली, ज्यानंतर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकनेही अशी काही प्रतिक्रिया दिली आहे.


लाइव्ह मॅचमध्ये हार्दिक पांड्यासोबत अशी घटना 


दरम्यान, गुजरात टायटन्स (GT) डावाच्या 10व्या षटकात हार्दिक पंड्या क्रीजवर होता आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्याच्यासमोर गोलंदाजी करत होता. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शॉट खेळत असताना हार्दिक पांड्याची बॅट हातातून सुटली आणि ती स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने पडली.


पत्नी नताशा हिची प्रतिक्रिया 


हार्दिक पांड्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक आश्चर्यचकित झाली. नताशा स्टॅनकोविकने पुन्हा धक्कादायक प्रतिक्रिया दिली आणि हातवारे करुन म्हणाली की हे काय झाले? 


 



व्हिडिओ व्हायरल होत आहे


हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोविकची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याच्या हातातून बॅट सुटल्यानंतर खुद्द हार्दिक पांड्याही हैराण झाला होता. या सामन्यात हार्दिक पांड्याने 47 चेंडूत 62 धावांची खेळी केली, पण त्याच्या संघाला 8 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले.