गुजरात टायटन्सच्या विजयाची `ही` आहेत तीन प्रमुख कारणे
गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत IPL 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरले.
मुंबई : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा ७ गडी राखून पराभव करत IPL 2022 च्या ट्रॉफीवर नाव कोरले. कर्णधार हार्दीक पंड्याच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी करत गुजरात संघाने हा किताब पटकावला. तर गुजरात संघाच्या विजयाची ही तीन कारणे प्रमुख कारणे आहेत, या तीन कारणांमुळे गुजरातला ट्रॉफीवर कब्जा करता आला. ही कारणे जाणून घेऊयात.
विस्फोटक बॅटसमन
गुजरात टायटन्सच्या या दोन बॅटसमननेही मोलाची भूमिका बजावली. यामध्ये सर्वात मोठा वाटा डेव्हिड मिलर आणि राहुलच्या तेवतियाचा होता. या दोन्ही फलंदाजांनी गुजरात संघाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले. डेव्हिड मिलरने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यात 481 धावा केल्या आणि राहुल तेवतियाने 16 सामन्यात 217 धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज संघाच्या फलंदाजीतील मजबूत दुवा ठरले. जेव्हा-जेव्हा गुजरात टायटन्स कठीण परिस्थितीत अडकला, त्या त्या वेळेस या दोन्ही बॅटसमननी गुजरातचा डाव सांभाळला.
धमाकेदार गोलंदाजी
गुजरात टायटन्सकडे T20 क्रिकेटचा दिग्गज खेळाडू रशीद खान होता. राशिद खानने आयपीएल 2022 च्या 16 सामन्यात 19 विकेट घेतल्या. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीत गुजरातकडे मोहम्मद शमी आणि लॉकी फर्ग्युसन होता. या गोलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत खूप कमी रन्स दिले. अंतिम सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यानेही या गोलंदाजांचे कौतुक केले.
कर्णधारपदाला साजेशी कामगिरी
आयपीएलची ट्रॉफी जिंकल्यानंतर हे नक्कीत बोलता येईल की हार्दीक पंड्याने कर्णधार पद लीलया पेललंय. हार्दिक पांड्याने संपूर्ण स्पर्धेत चमकदार नेतृत्व केले. आयपीएल 2022 पूर्वी, हार्दिककडे कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नव्हता, परंतु त्याने आपल्या कर्णधारपदाने सर्वांची मने जिंकली. हार्दिकने गोलंदाजीत चांगले बदल केले. डीआरएस घेण्याचे निर्णयही त्याचे अचूक ठरले. IPL 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 16 पैकी 12 सामने जिंकले. बॉल आणि बॅटनेही त्याने चांगली कामगिरी केली. गुजरातला विजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.