मुंबई :हैदराबाद टीमने गुजरातला 8 विकेट्सने पराभूत केलं आहे. हैदराबादचा घातक बॉलर उमरान मलिकचा शानदार फॉर्म पाहायला मिळाला. त्याला टीम इंडियामधून खेळण्याची संधी येत्या काळात मिळू शकते असं अनेकांनी म्हटलं जात असताना दिग्गज क्रिकेटपटूनंही विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायकल वॉन यांनी उमरानबाबत भविष्यवाणी केली. उमरान मलिक लवकरच टीम इंडियामधून खेळताना दिसणार आहे. BCCI च्या जागी मी जर असतो तर मी त्याला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी पाठवलं असतं असंही मायकल वॉन म्हणाला आहे. 



आयपीएल 2022 मध्ये उमरान मलिकची उत्तम कामगिरी सर्वजण पाहात आहेत. हैदराबादच्या विजयामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. हैदराबादने 4 कोटी रुपये देऊन त्याला टीममध्ये घेतलं. त्याने आयपीएलच्या 7 मॅचमध्ये 5 विकेट्स काढल्या आहेत. 2021 मध्ये सर्वात वेगानं बॉल फेकणारा तो खेळाडू होता. 


हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने अर्धशतक झळकवलं. हैदराबादने 2 गडी गमावून आपलं लक्ष्य पूर्ण केलं आणि गुजरातवर विजय मिळवला. हैदराबादचा हा सलग दुसरा विजय आहे. तर गुजरातचा पहिला पराभव आहे.