3 आठवडे 25 सामने, एकट्या हैदराबादच्या विजयानं बदललं Point Table चं समीकरण
हैदराबदच्या हॅट्रिकचा इतर टीमला फटका, पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल, मुंबई शेवटून पहिल्या स्थानावर कायम
मुंबई : आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी टीम मुंबई आणि चेन्नईकडे पाहिलं जात होतं. मात्र पंधराव्या हंगामात या दोन्ही टीमला पराभवाचं ग्रहण लागलं. यंदा 10 टीम असल्याने सामने अटीतटीचे होत आहेत. 3 आठवडे आणि जवळपास 26 सामने झाले आहेत.
हैदराबाद टीमच्या विजयी हॅट्रिकमुळे पॉईंट टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. या 3 आठवड्यात राजस्थान, कोलकाता यांच्यात पहिल्या स्थानासाठी चढाओढ पाहायला मिळाली. आता सध्या पॉईंट टेबलवर गुजरात टीम पहिल्या स्थानावर आहे.
पॉईंट टेबलची आकडेवारी काय सांगते?
गुजरातने 5 पैकी 4 सामने जिंकून पॉईंट टेबलवर पहिलं स्थान मिळवलं आहे. दुसऱ्या स्थानावर राजस्थान तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. हैदराबादने कोलकातावर 7 विकेट्सने पराभव मिळवला. कोलकाताचा हा सलग दुसरा आणि एकूण सामन्यातील तिसरा पराभव आहे.
पराभवाचा मोठा फटका कोलकाता टीमला बसला. पहिल्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर कोलकाता टीम आली. पाचव्या स्थानावर लखनऊ, बंगळुरू टीम सहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद टीम सातव्या स्थानावर आली आहे.
मुंबई. चेन्नई आणि हैदराबादमध्ये शेवटून पहिलं कोण अशी एक वेगळी स्पर्धा होती. मात्र ती चौकट मोडून हैदराबादने सलग तीन सामने जिंकले आणि सातव्या क्रमांकावर आपलं स्थान मिळवलं. 8 व्या स्थानावर दिल्ली त्यानंतर चेन्नई आणि दहाव्या स्थानावर मुंबई टीम आहे.