जेव्हा विराट होतो `मसाज मॅन`, या खेळाडूला खास ट्रिटमेंट, पाहा व्हिडीओ
मालिश, तेल मालिश, चंपी | विराटकडून खास खेळाडूला मसाज, पाहा व्हिडीओ
मुंबई : बंगळुरू टीमने राजस्थानवर 4 विकेट्सने मात केली. या सामन्यादरम्यान काही किस्से घडले. अंपायरच्या निर्णयावरून वाद झाला तर चहलच्या विकेटवर धनश्रीचा डान्स पाहायला मिळाला. इतकच नाही तर चक्क या सामन्यात कोहली आणि मॅक्सवेलमधील मैत्रीचं वेगळं गणित पाहायला मिळालं.
बंगळुरूची फलंदाजी सुरू असताना विराट कोहली ड्रेसिंग रुममध्ये मॅक्सवेलला बॉडी मसाज करत होता. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. विराट मॅक्सवेलला मसाज करताना दिसत आहे.
विराट कोहली राजस्थान विरुद्धच्या सामन्यात एवढी चांगली कामगिरी करताना दिसला नाही. कोहली 5 धावा करून आऊट झाला. आऊट झाल्यानंतर कोहली मॅक्सवेलला ड्रेसिंग रूममध्ये मसाज देताना दिसला. त्याच्या पाठीवर कोहली मारताना दिसत आहे.
ग्लॅन मॅक्सवेलला 6 एप्रिलपर्यंत खेळण्याची परवानगी नव्हती. मात्र 9 एप्रिलपासून तो प्लेइंग इलेव्हनचा महत्त्वाचा भाग असणार आहे. मॅक्सवेलने 97 सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. तर 2018 धावा केल्या.