IPL 2022 : विराट कोहलीचा महारेकॉर्ड धोक्यात, `या` खेळाडूची नजर
विराट कोहलीच्या 6 वर्षांपूर्वीच्या महारेकॉर्डवर धडाकेबाज फलंदाजाची नजर, पाहा कोण तो परदेशी खेळाडू
मुंबई: विराट कोहली आयपीएलच्या पंधराव्या हंगामात अत्यंत वाईट खेळत आहे. त्याचा फ्लॉप शो सुरूच आहे. आता विराट कोहलीच्या महारेकॉर्डवर परदेशी खेळाडूची नजर आहे. हा रेकॉर्ड धोक्यात असून लवकरच तो परदेशी खेळाडू मोडण्याची शक्यता आहे.
राजस्थानकडून जोस बटलरने यंदा आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडला. आपल्या तुफान फलंदाजीने राजस्थानला प्लेऑफच्या शर्यतीत महत्त्वाचं स्थान दिलं. 10 सामन्यात त्याने 3 शतक ठोकले आहेत.
जोस बटलरच्या तुफान बॅटिंगमुळे कोहलीचा 6 वर्षांचा महारेकॉर्ड आता धोक्यात आल्याची चर्चा आहे. जोस बटलरने आतापर्यंत झालेल्या 10 सामन्यात 588 धावा केल्या आहेत. यामध्ये 50 चौकार आणि 36 षटकार ठोकले आहेत.
विराट कोहलीने 2016 मध्ये 16 सामन्यात 973 धावा केल्या. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याचा हा रेकॉर्ड जोस बटलर मोडण्याच्या तयारीत आहे. विराट कोहलीने 4 शतक आणि 7 अर्धशतक ठोकले होते. सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता.
विराचा हा विक्रम परदेशी खेळाडू जोश बटलर मोडण्याच्या तयारीत आहे. 6 वर्षांचा रेकॉर्ड महाविक्रम मोडण्यासाठी जोस बटलरने कंबर कसली आहे. तर विराट कोहली पंधराव्या हंगामात खूप जास्त फ्लॉप खेळत असल्याचं दिसत आहे.