IPL 2022: Dhoni का घालतो 7 नंबरची जर्सी, पहिल्यांदाच केला खुलासा
Dhoni च्या नेतृत्वात सीएसके संघ पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. संघाने सराव देखील सुरु केला आहे.
मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सीएसकेसाठी 4 वेळा IPL ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आपल्या जर्सीवर असलेल्या 7 नंबरबाबत खुलासा केला आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी आणि सीएससीसाठी खेळतानाही 7 नंबरची जर्सी घालत असतो. (Why Dhoni wear 7 number jersey)
CSK च्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना धोनीने म्हटलं की, 'हा नंबर निवडण्यामागे एक साधे कारण आहे. अनेकांना सुरुवातीला वाटले की 7 हा लकी नंबर आहे पण मी हा नंबर एका साध्या कारणासाठी निवडला आहे. माझा जन्म 7 जुलै रोजी झाला. 7वा दिवस आणि 7वा महिना म्हणून मी हा नंबर निवडला. इतर गोष्टींचा विचार करण्याऐवजी आणि कोणता नंबर चांगला असेल, मी यासाठी माझा वाढदिवस निवडला होता.'
'बर्याच लोकांनी असेही म्हटले आहे की 7 ही एक तटस्थ संख्या आहे आणि जर ती तुमच्यासाठी काम करत नसेल तर ती तुमच्या विरोधातही काम करत नाही. हे माझ्या उत्तरात देखील जोडले जाऊ शकते. मी याबद्दल फार अंधश्रद्धाळू नाही पण हा एक असा नंबर आहे जो माझ्या हृदयाच्या जवळ आहे आणि मी तो वर्षानुवर्षे माझ्यासाठी जपून ठेवला आहे.'
यामागे आपली कोणतीही अंधश्रद्धा नसल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे. गतविजेत्या सीएसकेनेही धोनीच्या नेतृत्वात पुन्हा IPL 2022 साठी सराव सुरू केला आहे. CSK आयपीएलच्या 15 व्या हंगामातील उद्घाटन सामना खेळणार आहे. 26 मार्च रोजी सीएसकेचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (CSK vs KKR) होणार आहे, ज्यांनी दोनदा आयपीएल विजेतेपद पटकावले आहे. CSK चा संघ मुंबई (MI) नंतर 4 IPL चे विजेतेपद जिंकणारा दुसरा संघ आहे. CSK 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये IPL चॅम्पियन बनले.
CSK चा संघ
यावेळी सीएसके संघ जरा वेगळा दिसणार आहे. चेन्नईला चॅम्पियन बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा फाफ डू प्लेसिस यंदा दिसणार नाही. याशिवाय संघाला सुरुवातीच्या सामन्यांमध्ये दीपक चहरची उणीव भासेल, जो दुखापतीमुळे काही सामने खेळू शकणार नाही.