IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा पहिला फायनलिस्ट संघ आज कोण होणार? या प्रश्नाचं करोडो क्रिकेटप्रेमींनी आज उत्तर मिळणार आहे. क्वालिफायरच्या (First Qualifier) पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) हे दोन तगडे संघ आमने सामने असणार आहेत. यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) बाजी मारणार की महेंद्र सिंग धोणी (MS Dhoni) मात देणार हे आज स्पष्ट होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉईंटटेबलमध्ये पहिल्या दोन स्थानांवर असलेल्या संघांमध्ये पहिल क्वालिफायर सामना खेळला जातो. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गुजरात टायटन्स संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. गुजरातने साखळीत 14 पैकी तब्बल 10 सामने जिंकत पहिलं स्थान पटकावलं. तर सुरुवातीच्या खराब सुरुवातीनंतर चेन्नई सुपर किंग्सने स्पर्धा संपेपर्यंत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. चेन्नईने 14 पैकी 8 सामने जिंकली. आजचा सामना जिंकणार संघ थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे. 


मैदानाची साथ कोणत्या संघाला?
क्वालिफायरचा पहिला सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) खेळवला जाणार आहे. होमग्राऊंडवर सामना होत असल्याने चेन्नई सुपर किंग्सला फायदा होणार आहे. घरचं मैदान आणि घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा धोणीच्या चेन्नईला मिळणार आहे. असं असलं तरी चेन्नईला गुजरातचं आव्हान सोप असणार नाही. गुजरात संघ जबरदस्त फॉर्मात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत गुजरात सर्व संघांना भारी पडतेय. विशेष म्हणजे आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर गुजरातचा संघ पहिल्यांदाच चेन्नईच्या मैदानावर खेळायला उतरणार आहे. 


प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल नाही?
गुजरात आणि चेन्नईच्या प्लेईंग इलेव्हनबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघ आजच्या महत्त्वाच्या सामन्यात संघात फारसे बदल करण्याची शक्यता कमीच आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघ नऊवेळा तीच प्लेईंग इलेव्हन घेऊन मैदानात उतरला आहे. तर गुजरातनेही दहा सामन्यात प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. 


पाच नंबरच्या खेळपट्टीवर सामना
आयपीएल 2023 चा पहिला क्वालीफायर सामना चेपॉकच्या 5 नंबरच्या खेळपट्टीवर खेळवला जाणार आहे. ही खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच हा सामना मोठ्या धावसंख्येचा होणार आहे. 


कितीवेळा आमने-सामने
आयपीएलमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत तीनवेळा आमनेसामने आले आहेत आणि तिनही वेळा गुजरात टायटन्सने बाजी मारली आहे. म्हणजेच गुजरातविरुद्ध चेन्नईला एकदाही विजयाचं खातं खोलता आलेलं नाही. आता चौथ्यांदा हे दोन्ही संघ समोरासमोर उभे ठाकणार आहेत. यात गुजरात संघ विजयाची घोडदौड कायम ठेवतो की चेन्नई संघ गुजरातविरुद्ध पहिल्या विजयाची नोंद करत थेट फायनल गाठतं, हे आज स्पष्ट होईल.