New Rule in IPL 2023: भारतीय क्रिकेटमधली (Indian Cricket) सर्वात मोठी स्पर्धा अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) सोळाव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. या महिन्याच्या शेवटी म्हणजे 31 मार्चपासून आयपीएलला (IPL) सुरुवात होणार आहे. आयपीएलला काही दिवसांचाच अवधी उरला असताना आयपीएलसंबंधीत एक मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या या हंगामात एक मोठा नियम लागू होणार आहे (New rule to be implemented in IPL 2023). हा नियम सध्या सुरु असलेल्या महिलांच्या प्रीमिअर लीगमध्ये (Women Premier League) लागून करण्यात आला आहे. बीसीसीआयने हा नियण आता पुरुषांच्या आयपीएलमध्येही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयपीएलमधली चुरस आणखीनच वाढणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये आला नवा नियम
आयपीएल 2023 मध्ये एक नवा नियम लागू होणार आहे. बीसीसीआयने (BCCI) दिलेल्या माहितीनुसार आयपीएलमध्ये आता वाईड आणि नो बॉलवरही रिव्ह्यू घेता येणार आहे (Wide and No ball Using DRS). या नियमामुळे ऐन चुरशीच्या लढतीत सामना फिरु शकतो. हा नियम लागू होणार असल्याने कोणताही संघ चालाखी करु शकणार नाही. या नियमाचा सर्वाधिक फायदा फलंदाजाला होणार आहे. 


WPL मध्ये नियम लागू
4 मार्चपासून सुरु झालेल्या महिला प्रीमिअर लीगमधले पहिले तीन सामने धमाकेदार झाले आहेत. विशेष म्हणजे नवा नियम या स्पर्धेदरम्यान लागू झाला आहे. WPL च्या पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरातदरम्यान खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीतने वाईड बॉलवर DRS घेतला. हा नियम बऱ्याच जणांना माहित नसल्याने क्रिकेट फॅन्सनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर रविवारी झालेल्या दोन्ही सामन्यात संघांनी वाइड आणि नो बॉलवर DRS घेतला. त्यानंतर हा नियम चांगलाच चर्चेत आला आहे. याआधी कोणत्या स्पर्धेत हा नियम लागू नव्हता.


नो बॉलमुळे अनेक वाद
क्रिकेटच्या मैदानात नो बॉलशी संबंधीत अनेक वाद निर्माण झाले आहेत. 2022 आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने अंपायरने नो बॉलचा देताच सर्व टीमला पॅव्हेलिअनमध्ये बोलावून घेतलं होतं. पण अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. तसंच वाइड किंवा नो बॉलमुळे अनेक सामने फिरल्याचीही अनेक उदाहरणं आहेत. 


अंपायरने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, आयपीएलमध्ये लागू होणाऱ्या या नव्या नियमावर काही अंपायर्सने नाराजी व्यक्त केली आहे. ICC एलिट पॅनेलचे अंपायर सामन टफेल यांनी वाइड आणि नो बॉलसाठी रिव्हू घेतला जाऊ नये असं मत व्यक्त केलं आहे.