IPL 2023 play-offs Scenarios: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज दोन सामने होणार आहेत. यामधील पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्यात पार पडणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार आहेत. तर दुसरा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाइटरायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. आयपीएलची गुणतालिका पाहता हे दोन्ही सामने महत्त्वाचे असणार आहेत. या दोन्ही सामन्यांच्या निकालानंतर प्लेऑफची नेमकी काय स्थिती असेल हे स्पष्ट होणार आहे. 


राजस्थान विरुद्ध बंगळुरु


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात रॉयल संघर्ष होणार आहे. या सामन्याचा परिणाम गुणतालिकेवर पाहायला मिळणार आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने 12 सामन्यात 12 गुण कमावले आहेत. तर बंगळुरुचे 11 सामन्यात 10 गुण झाले आहेत. प्लेऑफमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच पराभव होणाऱ्या संघाचं आव्हान संपुष्टात येणार आहे. याचं कारण ज्या संघाचा पराभव होईल तो फक्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकणार आहे. इतक्या गुणांसह संघ प्लेऑफमध्ये आपलं स्थान कायम ठेवू शकणार नाही. यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.


दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडिअमवर झालेल्या मागील सामन्यात बंगळुरुने 7 धावांनी राजस्थानचा पराभव केला होता. या सामन्यात जर संजू सॅमसनचा संघ वचपा काढण्यात यशस्वी झाला तर बंगळुरुचा प्रवास संपू शकतो. 



चेन्नई विरुद्ध कोलकाता


चेन्नईचे 12 सामन्यात 15 गुण आहेत. तर दुसरीकडे नितीश राणाच्या नेतृत्वात खेळणारा कोलकाता संघ 12 सामन्यानंतर 10 गुणांवरर आहे. चेन्नईने जर हा सामना जिंकला तर 17 गुणांसह प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ ठरण्याची शक्यता आहे. पण जर कोलकाता जिंकली तर चेन्नईसमोर अनेक आव्हानं उभी राहू शकतात. यानंतर चेन्नईला शेवटचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. 


दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स पूर्णपणे आयपीएलच्या बाहेर गेलेली नाही. पण जर या सामन्यात पराभव झाला तर ते स्पर्धेतून बाहेर पडती. पण विजय झाल्यास प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याची आशा कायम असेल. पण ही आशाही जास्त नाही. कारण त्यांचं भवितव्य इतर संघांच्या खेळीवर अवलंबून असणार आहे. 


ईडन गार्डन्सवर झालेल्या गेल्या सामन्यात चेन्नईने कोलकाताचा पराभव केला होता. रहाणे आणि शिवम दुबे यांनी यावेळी तुफानी खेळी केली होती. आपल्या याच खेळीचं प्रदर्शन करत संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवणारा पहिला संघ होण्याचा प्रयत्न करणार आहे.