Mumbai Indians Gaming Chair: सध्या इंडियन प्रीमियर लिग सुरु असून या स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व संघांचे चाहते आपल्या आवडत्या संघाला पाठींबा देण्यासाठी मैदानाबरोबरच सोशल मीडियावरुनही फारच सक्रीय असतात. फ्रॅन्चायजींकडूनही या संघाच्या चाहत्यांसाठी वेगवेगळे मर्चंडाइज लॉन्च केले जातात. यात कधी टी-शर्ट तर कधी स्टीकर्स तर कधी ऑटोग्राफ केलेल्या मिनी बॅट लॉन्च केल्या जातात. मात्र मुंबई इंडियन्सने आता चाहत्यांसाठी थेट चेअर बाजारात आणली आहे. मात्र यावरुनही मुंबईच्या संघाला ट्रोल केलं जात आहे.


पहिला सामना पराभूत अन् आता खुर्चीवरुन ट्रोलिंग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबईची फारशी चांगली सुरुवात झालेली नाही. पहिल्याच सामन्यात त्यांना बंगळुरुच्या संघाने पराभूत केलं. 8 मार्च रोजी मुंबईच्या संघाचा दुसरा सामना घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यामध्ये मुंबई विजयाची नोंद करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. दरम्यान मुंबईच्या संघाने आपल्या चाहत्यांसाठी एक फॅन चेअर लॉन्च केली आहे. मात्र या चेअरचे फोटो समोर आल्यानंतर ती पाहून चाहते खुश होण्याऐवजी संतापले आहेत. संतापण्यामागील पहिलं कारण म्हणजे या खुर्चीची किंमत आणि दुसरी गोष्ट म्हणजे खुर्चीची क्वॉलिटी. मुंबई इंडियन्सने ही फॅन चेअर तब्बल 29000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहे. एवढी महाग किंमत असल्याने चाहत्यांनी या खुर्चीवरुन मुंबईच्या संघालाच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.



मुंबईच्या संघाने लॉन्च केलेल्या या चेअरच्या फोटोला ट्विटरवर 700 हून अधिक रिट्वीट मिळाले असून 12 हजारांहून अधिक लाइक्स मिळालेत. मात्र त्याचवेळी या चेअरवरुन अनेकांनी मुंबईच्या संघाला लक्ष्य केलं आहे. काहीही करुन चाहत्यांना वेडं लावायचं एवढा एकच धंदा यांना असल्याचा टोला एकाने लगावला आहे.



अन्य एकाने या खुर्चीवर 0 धावांवर बाद झालेला रोहित शर्मा बसलाय असा फोटो एडीट करुन रिप्लाय म्हणून पोस्ट केलाय.



अन्य एकाने याऐवजी थेट मैदानात जाऊन मी सामने पाहणं पसंत करेल असं म्हटलं आहे.



यावर रोहितला बसवा असं म्हणत एकाने मॉर्फ फोटो पोस्ट केला आहे.



तर एकाने रोहितला वजनावरुन ट्रोल करताना, या खुर्चीत रोहितही बसू शकणार नाही असा टोला लगावला आहे.



इशान किशनला अशा हजार खुर्चा विकत घ्यायला सांगून 15 लाख वसूल करा असा टोला अन्य एकाने लगावला आहे.



या चेअरने नेमकं होणार काय असं एकीने विचारलं आहे.



एका चाहत्याने तर ही खुर्ची आमच्याकडे 7 हजारांना मिळेल अशी कमेंट केलीय.



तुम्हाला या खुर्चीबद्दल काय वाटलं कमेंट करुन नक्की कळवा.