MS Dhoni Retirement: तगड्या मुंबई इंडियन्सला पाणी पाजून गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला आहे. 1 लाख 32 हजार प्रेक्षक मर्यादा असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात फायनल सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता थाला पाचव्यांदा चेन्नईला चॅम्पियन (IPL Champion) बनवणार की हार्दिक सलग दुसऱ्या कप मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचा हंगाम सुरू होण्याआधीपासूनच धोनीच्या निवृत्तीची (MS Dhoni Retirement) जोरदार चर्चा झाली. त्यावर धोनीने देखील स्पष्टपणे बोलणं टाळलं होतं. मला निर्णय घेण्यासाठी आणखी 8 महिने शिल्लक आहेत, असं धोनीने म्हटलं होतं. मात्र, धोनी अचानक निर्णय घेऊ शकतो, अशी क्रिडाविश्वास बोललं जातंय. अशातच आता चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) ट्विटची चर्चा होताना दिसत आहे.


काय आहे ट्विट?


प्रत्येक वेळी जेव्हा तू मैदानात पाऊल ठेवतो तेव्हा आमच्या आनंद गगनाच मावेना होतो, असं ट्विट चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) केलं आहे. यावेळी चेन्नईने धोनीचे 10 फोटो शेअर केले आहेत.


पाहा ट्विट 



स्टीफन फ्लेमिंग म्हणतात...


फायनलचा हा एक मोठा टप्पा आहे, एक मोठा प्रसंग आहे आणि या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी बरंच काम केलं आहे. आम्ही जे काही केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही संधीची वाट पाहत आहोत, असं चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. धोनीच्या याच्या नेतृत्वातील सीएसके संघाने 10 व्यांदा एन्ट्री केली आहे. आज जर चेन्नई जिंकली तर धोनी निवृत्तीची घोषणा करू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे आता धोनीच्या निर्णयावर सर्वांचं लक्ष आहे.