IPL 2023 : गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम राहणार का? पाहा दोन्ही संघाची संभाव्य Playing 11
GT vs DC Dream11 Prediction: आयपीएलच्या 16 व्या हंगामात आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा 44 वा सामना खेळला जाणार आहे.
GT vs DC Prediction Playing XI : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये जसजसा खेळ संपत आहे, तसतसे सामने रोमांचक होत आहेत. तसेच कालच्या 43 व्या सामन्यात लखनऊ आणि बंगळुरू (GT vs DC) संघात खेळला गेला. या सामन्यात बंगळुरु ने लखनऊचा 18 धावांनी पराभव केला. त्यानंतर आज (2 मे 2023) आज गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स (GT vs DC Dream11 Prediction) यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा 44 वा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेनुसार गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर आहे. आतापर्यंत गुजरातने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि फक्त 2 गमावले आहेत. परिणामी आजचा ही सामना जिंकून गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
गुजरात अव्वल तर दिल्ली दहाव्या स्थानावर
आतापर्यंत गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून संघाने 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. याआधीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातने विजय मिळवला होता. 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातने कोलकात्याचा 7 गडी राखून पराभव केला. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स हा संघ दहाव्या स्थानावर असून आतापर्यंत या संघाने 8 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत. याआधीही दोन्ही संघ आमनेसामने आले असून ज्यामध्ये गुजरातने दिल्लीचा 6 विकेटने पराभव केला होता. अशा परिस्थितीत दिल्लीविरुद्ध गुजरातचा वरचष्मा दिसत आहे.
वाचा : जे काही पाहतो ते... गंभीरसोबतच्या वादानंतर पहिली प्रतिक्रिया देत विराट स्पष्ट बोलला
खेळपट्टीचा अहवाल
यंदाच्या हंगामात गुजरातच्या खेळपट्टीवर फलंदाज फलंदाजीचा खूप आनंद घेऊ शकतात. या मैदानावर वेगवान गोलंदाजांचा फायदा असला तरी अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाजाना सामन्यात चांगली खेळी दाखवण्याची संधी असेल. हवामानाचा अहवाल पाहता नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला खेळपट्टी फायदेशीर ठरू शकते.
गुजरात टायटन्सचे खेळाडू
गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माला गेल्या सामन्यात दुखापत झाली होती. पण ही दुखापत तितकी गंभीर नाही. तसेच दिल्लीविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या विजय शंकर, अभिनव मनोहर आणि साई सुदर्शनला कोणत्या दोन खेळाडूंना संधी द्यायची हे संघासाठी कठीण आहे. मागील सामन्यातील शंकर आणि अभिनवची कामगिरी पाहून सुदर्शनला बेंचवर बसावे लागण्याची शक्यता आहे.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
गुजरात टायटन्स : रिद्धिमान साहा (डब्ल्यूके), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, जोश लिटल.
दिल्ली कॅपिटल्सची : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिल सॉल्ट (विकेटकीप), मिचेल मार्श, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अक्षर पटेल, अभिषेक पोरेल, एनरिच नारखिया, कुलदीप यादव, इशांत शर्मा आणि मुकेश कुमार.