IPL 2023 Jonny Bairstow: आयपीएलच्या आगामी हंगामासाठी (IPL 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अनेक संघांचे खेळाडू दुखापतग्रस्त (injured player) असल्याने स्पर्धेबाहेर पडल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पंजाब किंग्ससाठी (Punjab Kings) वाईट बातमी समोर आली आहे. ट्विट करत पंजाब किंग्जने ही माहिती दिलीये.


काय आहे पंजाबचं ट्विट ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला कळविण्यास आम्हाला खेद होत आहे की जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow Injury) त्याच्या दुखापतीमुळे आयपीएलच्या (IPL 2023) या मोसमात सहभागी होणार नाही. आम्ही त्याला शुभेच्छा देतो आणि पुढच्या हंगामात त्याला पाहण्यास उत्सुक आहोत. त्याच्या जागी मॅथ्यू शॉर्टचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे, असं पंजाब किंग्जने (Punjab Kings Tweet) ट्विट करताना म्हटलंय.


पाहा Tweet - 



बेअरस्टोला पंजाबने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनवेळी 6.75 कोटी रुपयांना संघात घेतलं होतं. बेअरस्टोसारखा तगडा खेळाडू संघात नसणं ही पंजाबसाठी वाईट बातमी आहे. मात्र, दुसरीकडे लिव्हिंगस्टोन सारखा खेळाडू आयपीएलच्या या हंगामासाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आता कॅप्टन शिखर धवनचं (Shikhar Dhawan) टेन्शन संपलंय.


पंजाब किंग्जचा संघ -


शिखर धवन, हरप्रीत सिंग भाटिया, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, सिकंदर रझा, शाहरुख खान, मोहित राठी, हरप्रीत ब्रार, ऋषी धवन, बलतेज सिंग, शिवम सिंग, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग,  भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, विध्वथ कवेरप्पा,राहुल चहल, अर्शदीप सिंग.