IPL 2023 Retention: पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या 16 व्या हंगामासाठी आता मिनी लिलाव (IPL 2023 Auction) होणार आहे. पुढील महिन्यात कोची येथे हा लिलाव पार पडेल. त्याआधी आयपीएलमधील (ipl 2023 retained players list) सर्व 10 संघांनी रिलीज खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे (BCCI) सोपवली आहे. एकूण 10 संघांनी 85 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता मिनी लिलाव मेगा लिलाव होणार की काय?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लिलावासाठी आता कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक आहे ते पाहूया...


चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) - 


चेन्नईने Chris Jordan आणि Dwayne Bravo यासारख्या दोन खेळाडूंना रिलीज केलंय. त्यामुळे आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची शिल्लक आहे. तर चेन्नई 7 पैकी 2 परदेशी खेळाडूंना संघात स्थान देऊ शकते.


दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) -


दिल्लीने फक्त 4 खेळाडूंना रिलीज केलं. तर दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलंय. त्यामुळे आता दिल्लीकडं 19.45 कोटी रुपये शिल्लक आहेत.


गुजरात टायटन्स (Gujarat Titans) -


गतविजेत्या गुजरातने देखील चार खेळाडूंना डच्चू दिलाय. त्यात त्यांनी Jason Roy आणि Varun Aaron ला संघातून वगळंल आहे. त्यामुळे आता संघाकडे 19.25 कोटी रुपये शिल्लक आहे.


कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) -


कोलकाताने स्टार गोलंदाज Lockie Ferguson, Shardul Thakur आणि Rahmanullah Gurbaz  या तिघांना ट्रेडद्वारे संघात समावेश केलाय. त्यामुळे संघाकडे आता फक्त 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत. केकेआर सर्वात कमी रक्कम असलेला संघ ठरलाय.


लखनऊ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) -


लखनऊने यंदा Andrew Tye, Jason Holder, Manish Pandey आणि Dushmanta Chameera या स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे संघाच्या खिश्यात 23.35 कोटी शिल्लक आहेत.


मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) -


मुंबईच्या संघात Jaydev Unadkat, Kieron Pollard आणि Tymal Mills यांच्यासह 13 खेळाडूंनी रिलीज केलंय. त्यामुळे मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक आहेत.


पंजाब किंग्ज (Punjab Kings) -


पंजाबने कॅप्टन Mayank Agarwal याच्यासह 9 खेळाडूंना रिलीज केलंय. त्यानंतर टीमकडे एकूण 7.05 कोटी शिल्लक आहेत.


राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) -  


राजस्थानने Daryl Mitchell आणि James Neesham यांचा पत्ता कट करत 13.20 कोटी  राखून ठेवले आहेत. 


रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) - 


रॉयल चँलेंजर्स बंगळुरू संघाने 8.75 कोटी रुपये शिल्लक ठेवले असून आरसीबीने Sherfane Rutherford ला रिलीज केलंय.


सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) - 


Kane Williamson आणि Nicholas Pooran यांसारख्या खेळाडूंना संघातून वगळ्यानंतर आता सनरायझर्स हैदराबादकडे  42.25 कोटी असणार असणार आहे. त्यामुळे लिलावात हैदराबादचा जलवा दिसण्याची शक्यता आहे.