महाराष्ट्रातील सर्वात मोठा टूरीजम प्रोजेक्ट 'नवीन महाबळेश्वर'; 235 गावांचा समावेश करण्याच्या आराखड्याला 100 हरकती

Satara Mahabaleshwar : सातारा जिल्ह्यातील सुमारे 748 चौरस किमी क्षेत्रावर हे नवीन महाबळेश्वर  विकसित केले जाणार आहे.  

| Nov 09, 2024, 19:26 PM IST

Mahabaleshwar Hill Station Development Plan :  सातारा - महाबळेश्वर पाचगणी भागात पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. याचाच विचार करून राज्य सरकारने नवीन महाबळेश्वर प्रकल्प करण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पात 235 गावांचा समावेश करण्याबाबत 100 हरकती आल्या आहेत. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी ‘एमएसआरडीसी’ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियक्ती केली आहे. 2019 मध्येच हा प्रकल्प हाती घेण्यात आला.

1/7

महाबळेश्वर हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. लाखो पर्यटक मोठ्या संख्यने भेट देत असतात.  यामुळे येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. आता लवकरच महाबळेश्वरला तोडीस तोड देणार नवीन महाबळेश्वर पहायला मिळणार आहे. MMRDC ने जबरदस्त प्लान बनवला आहे.  

2/7

नवीन महाबळेश्वरमध्ये येणारा परिसर सह्याद्री डोंगररांगांच्या उत्तर दक्षिणेला समुद्र सपाटीपासून सुमारे 1200 मीटर उंचीवर आहे. नवीन महाबळेश्वरला पोहोचण्यासाठी रोप वे ची सोय केली जाणार आहे.   

3/7

या प्रस्तावित प्रकल्पात पर्यावरणाला कोणताही धक्का न लावता निसर्ग पूरक शाश्वत पर्यटन केलं जावं अशी मागणी पर्यावरण प्रेमी यांनी केली जाते आहे.  

4/7

या नियोजित प्रकल्पा बाबत 9 नोव्हेंबर पर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या.आज शेवटच्या दिवसापर्यंत आत्ता पर्यंत फक्त 100 हरकती आल्या आहेत.

5/7

या परिसरातून सोळशी, उरमोडी, कांदाटी या उपनद्या वाहतात. येथेच कोयनेचे बॅक वॉटर आहे. यामुळे हा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे.   याबाबत या भागातील लोकांसोबत त्याच बरोबर पर्यावरण प्रेमी,सामाजिक कार्यकर्ते यांच्या सोबत बैठका घेण्यात आल्या होत्या.  

6/7

या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा नव्या अधिसूचनेनुसार कोयना बॅकवॉटर आणि परिसरातील गावांचा विकास करून नवीन महाबळेश्वर वसवले जाणार आहे.

7/7

सातारा,पाटण,जावली आणि महाबळेश्वर तालुक्यातील 235 गावांचा यात समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारने विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाची नियुक्ती केली आहे.