IPL 2023: आयपीएलचा यंदाचा हंगाम अधिक खास आहे. त्यामागची कारणंही तितकीच खास आहे. अनेकांच्या म्हणण्यानुसार (Mahendra Singh Dhoni) महेंद्रसिंह धोनी, अर्थात कॅप्टन कूल माही यंदा अखेरचं आयपीएल खेळत आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली मैदानात येणाऱ्या चेन्नईच्या संघानं यंदाच्या पर्वात 3 पैकी 2 सामने जिंकत प्रवास चांगल्याच वेगानं सुरु ठेवला आहे. पण, आता मात्र चेन्नईच्या विजयरथाचा वेग काहीसा मंदावू शकतो. कारण, ठरेल ते म्हणजे संघातील दोन महत्त्वाच्या खेळाडूंची एक्झिट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईच्या (Chennai Superkings) संघातील अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) पायाच्या बोटांना दुखापत झाली आहे. नुकत्याच खेळवल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स या संघाविरोधातील सामन्यातही तो खेळू शकला नव्हता. याच धर्तीवर चेन्नईच्या संघाकडून अधिकृत माहितीही देण्यात आली. जिथं पायाच्या बोटांवर असणाऱ्या किरकोळ दुखापतीमुळं सध्या त्याच्यावर उपचार सुरु असल्या कारणानं तो मुंबईविरुद्धच्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. थोडक्यात, दुखापतीतून सावरल्यानंतरच स्टोक्स राजस्थानविरोधातील सामन्यासाठी संघाचा भाग असू शकतो. पण, चिन्हं धुसरच. 


आणखी एक गडी दुखापतग्रस्त... 


भारतीय संघ आणि चेन्नईचा संघ गाजवणारा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) मुंबईविरुद्ध खेळताना दुखापतग्रस्त झाला. ज्यामुळं आता त्याला स्कॅन आणि इतर गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही त्यानं एक Over टाकली, पण त्यानंतर मात्र त्याला ड्रेसिंग रुमचीच वाट धरावी लागली. 


ड्रेसिंग रुममधील प्रथमोपचारांनंतरही तो मैदानात मात्र परतू शकला नाही. पायाच्या हॅमस्ट्रींगचं स्कॅनिंग करून त्यानंतर दुखापतीचं मूळ शोधून दीपकवर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळं तूर्तास तो IPL च्या या पर्वातील काही सामन्यांना मुकणार हे स्पष्ट होत आहे. 


हेसुद्धा वाचा : IPL 2023 : तो रक्तबंबाळ झाला तरीही खेळला; मिशेल सँटनरच्या जिद्दीपुढं भलेभले झुकले 


 


संघातून दोन महत्त्वपूर्ण खेळाडूंच्या दुखापती येत्या काळात चेन्नईच्या आणि पर्यायी माहीच्या चिंतेत भर टाकणार का? हाच प्रश्न आता क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करताना दिसत आहे. बरं, हे खेळाडू संघाबाहेर असताना संघात नेमकी कोणाची वर्णी लागणार? हा प्रश्नही सातत्यानं उपस्थित होताना दिसत आहे. 


बरं, या साऱ्यामध्ये महेंद्रसिंह धोनी त्याच्या संघात नेमके कोणते बदल करतो? त्याच्या हाताशी यावेळी कोणता खेळाडू संघाला तारण्याचं काम करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. थोडक्यात दोन हुकमी एक्क्यांसह आता चेन्नईला मैदानात उतरावं लागणार आहे. अशा परिस्थिती त्यांच्या रणनितीवरच भवितव्य अवलंबून असणार आहे.