Sanju Samson Viral Video: आयपीएलचा यंदाचा हंगाम आता चांगलीच रंगत धरताना दिसत आहे. बऱ्याच अंशी आता कोणता संघ जेतेपदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकते याचा तर्क क्रिकेटप्रेमी लावू लागले आहेत. दर दिवशी पार पडणाऱ्या प्रत्येत सामन्यात एक ना एक खेळाडू चर्चेता विषय ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका सामन्यातही अशाच एका खेळाडूचा साधेपणा सर्वांची मनं जिंकून घेतली. हा खेळाडू म्हणजे संजू सॅमसन (sanju samson ). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Rajasthan Royals च्या कर्णधारपदी असणाऱ्या संजू सॅमसनचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संजू फोनवर संवाद साधताना दिसत आहे. संघाच्याच सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. (IPL 2023 news video RR captain sanju samson receives phone call on fans mobile )


हेसुद्धा वाचा : International Cricket सोडा आणि...; 6 खेळाडूंना IPL कडून दोन पिढ्या बसून खातील इतकी दणदणीत ऑफर


 


Viral Video मध्ये संजू स्टँड्समध्ये असणाऱ्या चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. सीमारेषेनजीक असणाऱ्या एका जाळीच्या आड असणारे क्रिकेटप्रेमी आणि मैदानातून त्यांच्याशी संवाद साधू पाहणारा संजू हे दृश्य पाहताना त्याचा साधेपणा सर्वांचीच मनं जिंकून गेला. तिथं पलीकडे इतका मोठा खेळाडू आपल्या समोर असल्याचा आनंदही गर्दीतील प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. 


संजूनं ऐकलंच नाही...


गर्दीतल्याच एका चाहत्याच्या मोबाईलमधून संजू सॅमसन सेल्फी घेत असताना तितक्यातच त्यावर कोणाचातरी Call आला. सेल्फी घेण्यात व्यत्यय येत असल्यामुळं फोन उचलू नका, कट करा... असं चाहते त्याला सांगत होते. पण, संजूनं लाख सांगूनही न एकता फोन उचलला. तितक्यातच ज्या व्यक्तीचा फोन होता, त्यानं समोरच्या व्यक्तीला 'संजू भैया बोल रहे हैं....बोलो संजू भैया' असं म्हणत संजूकडे जणू विनंतीच केली. 


चाहत्याची ही विनंती ऐकल्यानंतर संजूनंही फोन उचलला आणि 'हां भैया क्या हाल है...?' असा प्रश्न त्यानं इथून विचारला. बस्स, मग काय? संजूचा हा अंदाज पाहून मैदानातच चाहत्यांनी कल्ला सुरु केला.



राजस्थानच्या संघानं हा व्हिडीओ शेअर करत त्यावर एक कमाल कॅप्शनही दिलं, 'मेसेज करण्यापेक्षा फोनच करा... कोण जाणे संजू सॅमसनच तुमचा फोन उचलेल'. खेळाडूंवर चाहत्यांचं असणारं प्रेम आणि खेळाडूही त्यांना देणारी ही आपुलकीची वागणूक या सर्वच गोष्टी या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.