International Cricket सोडा आणि...; 6 खेळाडूंना IPL कडून दोन पिढ्या बसून खातील इतकी दणदणीत ऑफर

IPL 2023 दणक्यात सुरु असतानाच आता खेळाडू त्यांच्या त्यांच्या संघाला बाद फेरीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांसाठी प्रचंड मेहनत करताना दिसत आहेत. संघाला यश मिळवून देणाऱ्या याच खेळाडूंच्या बाबतीत आयपीएलकडून मात्र वेगळाच विचार केला जात आहे.   

Updated: Apr 27, 2023, 12:41 PM IST
International Cricket सोडा आणि...; 6 खेळाडूंना IPL कडून दोन पिढ्या बसून खातील इतकी दणदणीत ऑफर  title=
IPL 2023 news Franchises Offer Crores of amount to 6 Top England Cricketers to Quit International Cricket details inside

IPL 2023 : आयपीएलचं यंदाचं पर्व सुरु झाल्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत सातत्यानं चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं आहे. कालाकरांचा सहभाग असो किंवा एखादी मिस्ट्रीगर्ल, एखादी चिअरलीडर असो किंवा मग खेळाडूची पत्नी. तिथं खेळाडू मैदान गाजवत असतानाच इथं मैदानाबाहेरही आयपीएलला चर्चेत आणणारे अनेक मुद्दे प्रकाशझोतात आले आहेत. कुठूनतरी खेळाडूंना मिळणारं मानधन, जेतेपदासाठी मिळणारी बक्षीसपात्र रक्कम, या साऱ्याचीही कमाल चर्चा होताना दिसत आहे. 

आयपीएलच्या श्रीमंतीनं अनेकांचेच डोळे दीपत असताना आता पुन्हा एकदा या फ्रँचायझीनं कमालच केली आहे. Times London चा हवाला देत PTI नं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार Indian Premier League फ्रँचायझीकडून काही अविश्वसनीय व्यवहार केले जाण्याची तयारी दाखवली जात आहे. ज्यासाठी पहिल्या टप्प्यात फ्रँचायझीकडून इंग्लंडच्या 6 आघाडीच्या खेळाडूंना चक्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याची विचारणा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (IPL 2023 news Franchises Offer Crores of amount to 6 Top England Cricketers to Quit International Cricket details inside) 

International Cricket सोडल्यानंतर पुढे काय? 

खेळाडूंना International Cricket सोडण्यास सांगत वर्षभर त्यांनी फक्त franchise cricket खेळावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून काढता पाय घेण्यासाठी या खेळाडूंना तब्बल 5 मिलियन पाऊंड, म्हणजेच भारतीय चलनानुसार साधारण 50 कोटी रुपये इतकी दणदणीत ऑफर देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

जवळपास 10 आयपीएल संघ आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही विस्तारण्याची तयारी करत आहेत. Caribbean Premier League, the SA T20 League, ILT20 League of UAE अशा आगामी स्पर्धांमध्ये आयपीएलचीही चर्चा दिसू शकते. 

हेसुद्धा वाचा : IPL 2023 मध्ये Arjun Tendulkar गोलंदाजीत अपयशी, म्हणजे तो वाईट खेळाडू? हे योग्य की अयोग्य तुम्हीच ठरवा

 

दरम्यान, अद्यापही या मोठ्या व्यवहाराची माहिती समोर आली असली तरीही कोणत्या संघांनी हे व्यवहार करण्याची तयारी दाखवली आहे आणि कोणत्या खेळाडूंना यासाठीचे प्रस्ताव मिळाले आहेत ही माहिती मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या खेळाडूंपुढे प्रस्ताव दिले असून, ही चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. जर, आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी हे प्रस्ताव स्वीकारले तर, इंग्लंड क्रिकेट बोर्ड किंवा इंग्लंड या देशाऐवजी या खेळाडूंना थेट भारतातून पगार जाईल. थोडक्यात फुटबॉल क्लब्सची आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारी उलाढाल पाहता येत्या काळात क्रिकेटमध्येही तेच चित्र दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.