Mumbai Indians: येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. सर्व क्रिकेट प्रेमी या लीगची आतुरतेने वाट पाहतायत. यामध्ये पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. अशामध्येच आता भारतीय चाहत्यांना हैराण करवणारी एक गोष्ट समोर आली आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टीमने पाकिस्तानी खेळाडूंची टीममध्ये एन्ट्री केली आहे. 


पाकिस्तानी खिलाडूंची मुंबईच्या टीममध्ये एन्ट्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्स सर्वात लोकप्रिय टीम मानली जाते. मात्र सध्या एका वेगळ्याच कारणाने मुंबई इंडियन्सची टीम चर्चेत आली आहे. मुंबईने 2 पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतलं आहे. मुंबईने हमाद आजम आणि अहसान आदिल यांची आपल्या टीममध्ये एन्ट्री केली आहे. 2008 नंतर पहिल्यांदा आयपीएलच्या कोणच्या फ्रेंचायझीने पाकिस्तानी खेळाडूंना आपल्या सोबत घेतलंय. 


Mumbai Indians साठी खेळणार पाक खेळाडू?


मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये न्यूयॉर्कच्या टीमची खरेदी केली आहे. हे दोन्ही पाकिस्तानी खेळाडू याच मुंबई इंडियन्स न्यूयॉर्क टीमचा भाग असणार आहे. मुख्य म्हणजे ही लीग भारतात खेळावली जाणार नाहीये. 


मिळालेल्या माहितीनुसार, ही लीग केवळ अमेरिकेमध्ये खेळवली जाणार आहे. यामध्ये 4 आयपीएल फ्रेंचायझींनी अमेरिकेतील मेजर लीगमधील टीम्स खरेदी केल्या आहेत.


हमाद आझम हा पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानाला जातो. त्याने पाकिस्तानसाठी वनडे आणि टी-20 सामने खेळलेत. हमादने पाकिस्तान टीमकडून 11 वनडे आणि 5 टी-20 सामने खेळलेत. याशिवाय आदिलने पाकिस्तानसाठी तीन टेस्ट सामने आणि सहा वनडे सामने खेळले असल्याची माहिती आहे.


आयपीएलमध्ये पाक खेळाडूंवर बंदी


पाकिस्तानी खेळाडू आयपीएल खेळू शतक नाहीत, कारण त्यांच्यावर बंदी आणली आहे. 2008 मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आयपीएलमधून पाकिस्तानी खेळाडूंना बॅन करण्यात आलं. मात्र भारताशिवाय इतर लीगमध्ये पाकिस्तानी खेळाडू खेळताना दिसतात. 


2008 साली पहिल्यांदा आयपीएल खेळवण्यात आली होती. त्यावेळी काही पाकिस्तानच्या खेळाडूंचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये शाहीद आफ्रिदी, शोएब अख्तर, कामरान अकमल याच खेळांडूंचा आयपीएलमध्ये समावेश होता. मात्र त्यांनंतर पाकिस्तामी खेळाडूंवर बंदी आणण्यात आली.