IPL 2023, Mumbai Indians : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 16 व्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत गुजरात टायटन्स (GT) ने मुंबई इंडियन्सचा (MI) 55 धावांनी पराभव केला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने पहिली फलंदाजी करताना 208 धावांचा डोंगर मुंबई समोर उभा केला. या उत्तरादाखल मुंबईला 20 षटकात 9 बाद 152 धावा करता आल्या. गुजरातने हा सामना 55 धावांनी जिंकला असून मुंबई इंडियन्सला सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात विरुद्ध मुंबईच्या या सामन्यामुळे संपूर्ण गुणतालिकेचं गणितचं बदललं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई इंडियन्सचा (MI) या हंगामातील चौथा पराभव आहे.  गुजरातने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 207/6 अशी मजल मारली आणि मुंबईला 152/9 पर्यंत धावा केल्या. 2017 नंतर धावांच्या बाबतीत मुंबईचा हा सर्वात मोठा पराभव आहे. गुजरातसमोर मुंबईकडून नेहल वढेरा (40) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याचबरोबर कॅमेरून ग्रीनने 33 धावांची खेळी खेळली. हे दोघे वगळता मुंबईचा एकही खेळाडू 25 धावांचा आकडा पार करू शकला नाही. सूर्यकुमार यादव (23), पियुष चावल (18), इशान किशन (13), अर्जुन तेंडुलकर (13), कर्णधार रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांनी प्रत्येकी दोन धावाच केल्या. गुजरातकडून नूर अहमदने तीन बळी घेतले. मोहित शर्मा आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.    


वाचा : RCB विजयाची मालिका कायम राखणार की KKR, कोण ठरणार वरचढ?


मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. रोहित शर्माचा निर्णय हा अंगलट आला. गुजरातने 6 बाद 207 धावा केल्या. विजयाचे मोठे लक्ष्य जपणाऱ्या मुंबई इंडियन्सची पडझड झाली. त्यांना 20 षटकात केवळ 152 धावा करता आल्या.. 



आयपीएल पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानी


मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) टॉप 4 मध्ये येण्यासाठी आठ पैकी 5 सामने जिंकणे आवश्यक आहेत. कारण चेन्नई सुपर किंग्ज , गुजरात, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जेंट्स  उर्वरित सामन्यांपैकी एखाद दोन सामने सोडून इतर सामने जिंकल तर मुंबई इंडियन्स काही खरं नाही. आयपीएलच्या या पाँइंट टेबलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज पहिल्या स्थानी,  गुजरात टायटन्स दुसऱ्या, राजस्थान रॉयल्स तिसऱ्या, लखनऊ सुपर जेंट्स चौथ्या, बंगळुरू सहाव्या, पंजाब किंग्ज सहाव्या, मुंबई सातव्या, कोलकाता आठव्या, हैदराबाद नवव्या आणि दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहे.